Crime NewsLatest NewsYavatmal
एसबीआयच्या दोन एटीएममध्ये छेडछाड; सव्वा लाखांची रोकड लंपास,
यवतमाळ : यवतमाळ शहरातील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंटसमोरील आणि उमसरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) दोन एटीएममध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी हात साफ करत एकूण १ लाख १४ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीघे संशयित चोरटे कैद झाले असून, आता अवधूतवाडी पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
| प्रतिनिधी : दुर्गेश कान्हु