LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

धावण्याची शिक्षा दिली; प्रशिक्षणादरम्यान माजी सैनिकाचा मृत्यू — एसआयटी चौकशीची मागणी

चांदुरबाजार : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचलपूर तालुक्यातील सावळापूर येथील माजी सैनिक पंकज घावट (43) यांचा दौड लावत असताना मृत्यू झाला आहे. शारीरिक व्यथा असूनही जबरीने धावायला लावल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

सैन्यातून निवृत्त होऊन पोलिस दलात सेवा… पण आयुष्य अर्ध्यावर संपलं

पंकज घावट हे आर्टिलरी गनर रेजिमेंटमधून निवृत्त झाल्यानंतर दहा महिन्यांपूर्वी नागपूर शहर पोलिस दलात भरती झाले होते. सध्या धुळे पोलिस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत होते. त्यांची पासिंग आउट परेड ९ जून रोजी होणार होती.

२८ मे रोजीचा दुर्दैवी दिवस
प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात, २८ मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यासह २५ रिक्रूटना २६ किमी धावण्याची शिक्षा दिली. पंकज घावट यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगून सूट मागितली होती. पण ती नाकारून त्यांना जबरीने धावायला लावल्याचा आरोप आहे. धावत असताना ते अचानक कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पत्नीची मागणी — एसआयटी चौकशी व्हावी

मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, पंकज घावट यांच्या पत्नी रूपाली घावट यांनी हा प्रकार हेतुपुरस्सर शिक्षा देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

गुरुवारी, सावळापूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरात शोककळा पसरली होती, आणि नागरिकांत संवेदना व संतापाची भावना होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!