LIVE STREAM

Latest NewsNanded

अर्धापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा; कारवाईची मागणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील गोंधळ उघडकीस आला आहे. बांधकाम विभागातील एक कर्मचारी कार्यालयातील स्टोअर रूममध्ये दार बंद करून झोपा काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत संबंधित कर्मचारी स्टोअर रूममध्ये आरामात झोपलेला स्पष्टपणे दिसत आहे. हे पाहून संतप्त झालेल्या नागरिकाने सदर प्रकाराचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला, आणि यानंतर ह्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे.

स्टोअर रूममध्ये झोपेचा अड्डा?
ज्या खोलीत हा कर्मचारी झोपलेला होता ती पंचायत समितीच्या स्टोअर रूमची असल्याचे स्पष्ट झाले आहे. दार बंद करून झोप घेणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

कारवाईची जोरदार मागणी
हा कर्मचारी अर्धापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या निष्काळजी कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.

व्हिडिओ व्हायरलने उडाली प्रशासनात खळबळ
या व्हिडिओनंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सरकारी कार्यालयातील शिस्त व जबाबदारीचा अभाव समोर येत आहे.

प्रतिनिधी: मनोज मनपुर्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!