LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ राज्यकर्त्या आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथील त्यांच्या स्मारकास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.

अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीने चालवलेल्या न्यायनिष्ठ व धर्मनिष्ठ राज्यकारभाराचं आजही देशभरात स्मरण केलं जातं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या आदर्श राजकारभाराच्या आणि लोककल्याणकारी धोरणांच्या शिकवणी आजच्या शासन व्यवस्थेसाठी मार्गदर्शक आहेत.”

या अभिवादन प्रसंगी स्थानिक मान्यवर, महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता अहिल्यादेवींच्या स्मृतीला मानवंदना देण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!