LIVE STREAM

AmravatiCity CrimeLatest News

सूरज सावते हत्या प्रकरण उघडकीस: पाच आरोपी मालखेड जंगलातून अटकेत!

अमरावती : शनिवारी रात्री नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका बार समोर चाकूने भोसकून सूरज उर्फ सावत्या दिवाकर सावते (वय 25, रा. शेगाव) याची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अवघ्या काही तासांत या घटनेचा छडा लावत पाचही आरोपींना मालखेड जंगल परिसरातून तसेच चांदूर रेल्वे भागातून ताब्यात घेतले.

खून करून जंगलात लपले, तरीही पोलिसांचा पाठलाग चुकवू शकले नाहीत!
सदर प्रकरणात मृत सूरज सावते याच्या भावाच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत आरोपींचा माग काढला आणि मालखेड जंगल व चांदूर रेल्वे परिसरात मोठ्या शिताफीने सापळा रचून त्यांना अटक केली.

पाच आरोपींची ओळख
सुनील सुरेश वानखडे (वय 35, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, शेगाव)
दिपक सुधीर निस्ताने (वय 25, रा. मालखेड)
रोहित अशोक खंडारे (वय 24, रा. मालखेड)
विक्की उमेश शेंडे (वय 23, रा. मालखेड)
अक्षय वसंत चव्हाण (वय 19, रा. लालखेड)

वादातून घेतला सूड, आरोपींची कबुली
मुख्य आरोपी सुनील वानखडे याचा मृतक सूरज सावतेसोबत जुन्या वादाचा राग होता. त्याने सतत शिवीगाळ व त्रास दिल्यामुळे त्रस्त होऊन, सुनीलने इतर चार मित्रांना सोबत घेऊन सूरजवर चाकूने हल्ला केला व ठार केले, अशी स्पष्ट कबुली पाचही आरोपींनी नांदगाव पेठ पोलिसांसमोर दिली आहे.

पोलीसांची कौतुकास्पद कारवाई
या प्रकरणात पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट 2 चे अधिकारी राजेश जानकर, श्रीकांत नागे व प्रदीप वानखडे यांनी कारवाई करत अत्यंत प्रभावीपणे आरोपींना अटक केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!