गृहविज्ञान विभागामध्ये राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
अमरावती – (दि. 30.10.2024) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभागाच्यावतीने राष्ट्रीय पोषण माहनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग प्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. संयोगिता देशमुख, विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. विविध पोस्टर, पपेट, तोरण, फ्लिप चार्टच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. वैशाली धनविजय यांनी राष्ट्रीय पोषण माह चे महत्व तसेच आरोग्यदायी आहाराचे महत्व पटवून दिले. गृहविज्ञान विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने परसोडा येथे पोषणावर बोलू काही हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच मंदाताई घुले, उपसरपंच योगिता घुले, किशोर घोडके, विलास दुर्गे, नवनाथ घनतोंडे उपस्थित होते. विद्याथ्र्यांनी यावेळी अॅनिमिया या विषयावर पथनाट्यातून जनजागृती केली. तर अन्न व पोषण अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांनी जंक फुड, हेल्दी फुड या विषयावर पपेट शो सादर केला. जागतिक ह्मदय दिनानिमित्त गृहविज्ञान विभाग व झेनिथ हॉस्पिटल यांच्या सहयोगाने सांस्कृतिक भवन येथे आहार प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीच्या माध्यमातून महत्वाच्या बाबींवर जनजागृती करण्यात आली. विद्यापीठ परिसरात कॅम्पस वॉकच्याव्दारे परिसरातील रानभाज्या कशा ओळखाव्या यावर डॉ.वैशाली धनविजय यांनी मार्गदर्शन केले. अॅनिमियावर झालेल्या चर्चासत्रात अॅनिमिया म्हणजे काय, अॅनिमिया होण्याची कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार याविषयी विद्याथ्र्यांनी माहिती दिली.
पोषण माहच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली धनविजय होत्या. यावेळी विभागाद्वारे आयोजित विविध कार्यक्रमांचा चित्रफितीद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. वैशाली धनविजय यांनी विद्याथ्र्यांना मागर्दर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सुमित गेडाम, सुमेध वडुरकर, शिल्पा इंगोले, आयतल कामदार, दिव्यानी नवले, दिपाली भैसे, सुम्बुल डेलानी, मयुरी कुरळकर यांनी परिश्रम घेतले.