LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती जिल्ह्यात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा

अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात बकरी ईदचा पवित्र सण मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांतता, सलोखा आणि आनंदात साजरा केला. आज सकाळी 7 वाजता नमाज अदा करून मुस्लिम समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

खल्लार परिसरातही ईदच्या नमाजासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. नमाज अदा केल्यानंतर समाजाच्या वतीने विशेष दुवा करण्यात आली – “सर्वांना सुख, शांती लाभो, मान्सून वेळेवर यावा आणि बळीराजाला चांगले उत्पन्न मिळो.”

या प्रसंगी विशेष बाब म्हणजे, सर्व धर्मीय नागरिकांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या, ज्यातून सामाजिक एकतेचे दर्शन घडले. ईदच्या या निमित्ताने धर्मनिरपेक्षतेचा आदर्श खल्लार व परिसरात पाहायला मिळाला.

प्रशासनाची सज्जता
पोलीस प्रशासनाने ईदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था ठेवली होती. स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या.

सणाचा आनंद, सामाजिक सलोखा
सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात सौहार्दाचे वातावरण होते. सर्व धर्मीय नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एकतेचा संदेश देत होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!