LIVE STREAM

AmravatiLatest News

माना पोलिसांचे ‘प्रहार ऑपरेशन’ – अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई.

अमरावती : माना पोलीस स्टेशनने अवैध दारू विक्रेत्यांवर जोरदार प्रहार करत सलग तीन दिवस केलेल्या धडक कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. “प्रहार ऑपरेशन”अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

5 जून – माना बाजारात सुरुवात
माना येथील मुख्य बाजार परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या देशी दारू विक्रीवर पोलीसांनी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली. परंतु यानंतरही अवैध दारू विक्री सुरुच असल्याचे निदर्शनास आल्यावर माना पोलिसांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला.

6 जून – गुप्त माहितीवरून दुसरी कारवाई
ठाणेदार सुरज सुरवसे व पोउनि गणेश महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 6 जून रोजी मागील ठिकाणी पुन्हा कारवाई करत 25 ते 30 पोलीस व होमगार्डसह मोठा छापा टाकण्यात आला. मुख्य आरोपी पळून गेला, मात्र दोन जणांना अटक करण्यात आली.

7 जून – खापरवाडा येथे मोठी धडक
आज दिनांक 7 जून रोजी खापरवाडा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या रोशन गवई, धीरज सावळे व अवधूत बर्डे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2660 रुपयांचा शीलबंद देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई मानाचे ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनात पोउनि गणेश महाजन, पोहेका राजेश डोंगरे, पोहेका जयकुमार मंडावरे, पोहेका उमेश हरमकर, पोहेका पंकज वाघमारे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी गायकवाड यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!