LIVE STREAM

Amaravti GraminLatest NewsSports

अमरावतीत यशस्वी ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप

अमरावती – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती जिल्हा एमएच स्पोर्ट कराटे डॉ. असोसिएशन अमरावती, नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा, राजेश्वर इंडियन हायस्कूल बडनेरा आणि द फाइटर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचा समारोप कपिल बुद्ध विहार, बडनेरा नवी वस्ती येथील सभागृहात उत्साहात पार पडला.

मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “दरवर्षी उन्हाळ्यात शिबिराचे आयोजन हे केवळ खेळापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी मंच ठरतो. कराटे, योगा, मार्शल आर्ट, शिवकालीन मर्दानी खेळ, रोप स्कीपिंग, संरक्षण कौशल्ये, बुद्धिबळ, मैदानी खेळ यांसह विविध उपक्रमांतून प्रशिक्षण दिलं जातं.”

समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश बनसोड, प्रा. अमोल मिलके, गजानन सावंत, सुभाष बेलेकर, विपिन सर, स्नेहल फोंडकर, रसिका धुर्वे व्यासपीठावर उपस्थित होते.

साई स्पोर्ट अँड म्युझिकचे संचालक राजेश लवणकर यांच्या हस्ते शिबिरात सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक प्रशिक्षक यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. कराटे, आत्मरक्षण तंत्र, रोप स्कीपिंग आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!