LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

‘आपदा मित्र’च्या प्रयत्नांनी अलफेजोदिनचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

मोर्शी – मोर्शी तालुक्यातील सिभोंरा धरण परिसरात मासेमारी केंद्राजवळ 08 जून रोजी बुडालेल्या अलफेजोदिन जाकीरोदिन काजी (वय 16, रा. शहापुर पुनर्वसन, ता. वरुड, जि. अमरावती) याचा मृतदेह अखेर आपदा मित्रांच्या साहाय्याने सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात आला.

अलफेजोदिन हा नुर कॉलनी, मोर्शी येथे राहणारा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत झिरो पॉईंट, सिभोंरा धरणाजवळ आंघोळीसाठी गेला होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तो खोल पाण्यात गेला आणि बुडून बेपत्ता झाला.

आपत्कालीन प्रतिसादाची साखळी तत्काळ सुरू
सुमारे 4 वाजता युवक बुडाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येयकर यांना मिळताच, त्यांनी तात्काळ मोर्शी तहसील प्रशासन, पोलीस स्टेशन व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांना कारवाईचे आदेश दिले.

रामेकर यांनी मोर्शी येथील आपदा मित्रांना तातडीने घटनास्थळी पाठवले.
संध्याकाळी 4.15 च्या सुमारास आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लाईफ बॉय जॅकेट, रोप व बांबूच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली.

मदतकार्याची शर्थ
पोलिस व महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांनी अखेर अलफेजोदिनचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी मोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मृतकाच्या नातेवाईकांना ही माहिती पोलिसांनी दिली असून त्यांच्या स्वाधीन मृतदेह सोपवण्यात आला.

आपदा मित्र व जलमित्रांची टीम होती सज्ज
या शोधमोहीमेत पुढील आपदा बचाव दलाचे सदस्य सहभागी झाले होते:
आपदा मित्र: प्रियांशु तायवाडे, विवेक सावरकर, राज कुरवाडे, सागर तायडे, सतीश खंडारे
जीवनसेतू जलमित्र: प्रदीप तायडे, प्रतीक नारिंगे, आयुष ठाकरे

तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक अमोल बुरकुल, पो. ह. छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, श्यामसिंग चुंगडा हे पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते व पुढील तपास करत आहेत.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी
युवक बुडाल्याची घटना समजताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनेनंतरच्या त्वरित व समन्वयित मदत कार्यामुळे प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!