कुंभार समाजातील गुणवंतांचा सत्कार संपन्न
अमरावती : कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, राजकीय प्रतिनिधी, व्यवसायी, उद्योजक इ.गुणवान व्यक्तींना समाज गौरव, समाज भूषण पुरस्काराने स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाजातील मान्यवर व्यक्तींच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुंभार समाजाचे अध्यक्ष श्री सुधाकर शेंडोकार, उपाध्यक्ष अॅड गजाननराव तांबटकर, सचिव सुरेन्द्र सरोदे,समाजोन्नती समितीचे अध्यक्ष श्री पंजाबराव काकडे, सचिव डॉ श्रीरामजी कोल्हे, महिला अध्यक्षा श्रीमती प्रभाताई भागवत,गोरोबा काका पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भगवानजी जामकर, सचिव श्री अरुणराव पोहनकर, माजी अध्यक्ष श्री देविदास धामणकर, श्री देविदासजी काळकर, डॉ संजय साळविकर, श्री रमेशराव,तांबट, बेंगलोर, श्री केशवराव मदनकर, दयापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री अरुणभाऊ चोंडके उपस्थित होते.
।श्री संत गोरोबा काका प्रवेशद्वार झाल्याचा आनंद।
अमरावतीच्या माजी खासदार यांच्या विकास निधीतून मंजूर संत गोरोबा काका प्रवेशद्वार आज साकार झाले. गेल्या अनेक वर्षांपासूनची कुंभार समाजाची मागणी पूर्ण केल्या बद्दल श्री सुधाकर शेंडोकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद व्यक्त करून आभार मानले. यावेळी त्यांनी गोरोबा भवनाच्या बांधकामासाठी निधी, मंदिरासमोर सिमेंट रोड व प्रवेशव्दाराजवळ बस स्टॉप निर्मितीची मागणी केली.
समाज गौरव, समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत
सुप्रसिद्ध उद्योजक अरुणभाऊ चोंडके, रामचंद्र कापडे, दशरथ मानकर,सौ.दुर्गाताई लोंदे, मारोती तांबट,संतोष सरोदे, , किशोर तळोकार यांना समाज गौरव तर सेवानिवृत्त सैनिक श्री व्यंकटेश वाघ यांना समाज भूषण तसेच स्व.केशव खोपे कारंजा लाड यांना मरणोत्तर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाज भवनाच्या बांधकामासाठी देणगी
समाजातील दानशूर व्यक्ती श्री केशव मदनकर यांनी गोरोबा भवन बांधकामासाठी वडिल स्व.श्री रामकृष्णाजी मदनकर यांचे स्मृतीप्रीत्यर्थ रु.१०११११/- धनादेश संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सतिश गावंडे यांचे सुपुर्द केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री सुरेन्द्र सरोदे केले, आपल्या भाषणात त्यांनी संस्थेचा पूर्व इतिहास तसेच भविष्यातील योजना याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा.सुरेश नांदुरकर व प्रतिभा चांदुरकर तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजानन तांबटकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्वश्री सतिश गावंडे, कोषाध्यक्ष, मधुकर खांडेकर सहसचिव, गजानन तांबटकर उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सुनील भागवत,युवाध्यक्ष रमेश अंबुलकर,सौ.निर्मलाताई नांदुरकर कार्यकारी मंडळ विलास धामणकर, विनायक तायडे, विनोद मेहरे, राजेंद्र भागवत, सुनिल काळकर, गजानन काकडे, नंदकिशोर काकडे, नंदकिशोर नांदुरकर, मोहनराव नांदुरकर, शंकरराव धामणकर, राजेंद्र नांदुरकर, राजेंद्र मांगुळकर, पंडित जवळेकर, रविकांत काकडे, गजानन मेहरे,गोकर्णाताई कोल्हे, सविता कोल्हे, सुषमाताई काळकर, सुषमाताई काकडे, मंदाताई काळे, प्रा. वैशाली विलास नांदुरकर यांच्या सह नागरिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.