LIVE STREAM

Latest NewsNagpur

नागपूर: यशोधरा नगर पोलिसांची यशस्वी कारवाई – लाखोंचा घरफोडी प्रकरण उघड

नागपूर – नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिसांनी दोन घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत दोघा चोरट्यांना अटक केली आहे. या चोरट्यांनी घरात घुसून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करत एकूण 3 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रकरणाच्या तपशिलानुसार, फिर्यादी किशोर मारुती निमजे आणि फिर्यादी रोहित प्रकाश धकाते यांच्या घरी घरफोडी करून सोनं व चांदीचे दागिने चोरले गेले होते. पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कुंदनलाल गुप्ता नगर येथून 25 वर्षीय राहुल राजू हाटेवार व 25 वर्षीय निकेश बलराज शाहू यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे:

सोन्याच्या दोन अंगठ्या – किंमत: ₹40,000
सोन्याचे मंगळसूत्र – किंमत: ₹1,05,000
सोन्याचा गोफ
चांदीची अंगठी
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹3,04,500 असल्याचे सांगण्यात आले.

ही महत्त्वाची कारवाई परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त बंडीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तपास व कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे, तसेच पोलीस कर्मचारी राहुल बोंदरे, किशोर देवांगन, संदीप वानखेडे, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, रितेश दुधे, प्रवीण बावनकर आणि कोमल गुज्जर यांचा मोलाचा सहभाग होता.

या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून यशोधरा नगर पोलिसांच्या वेगवान आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!