संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती तातडीने सादर करण्याबाबत खर्च निरीक्षकांचे आदेश
अमरावती, दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गर्मित केलेली आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर2024 रोजी निवडणूक होणार असून निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.
निवडणुक काळातील संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करुन देण्याबाबत अग्रणी बँक, सर्व शासकीय व खाजगी बँक तसेच सह निबंधक, सहकारी पतसंस्था, अमरावती यांची सभा खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थित सर्व बँक अधिकारी व सह निबंधक यांना निवडणुक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे सर्व संशयास्पद व्यवहारांची माहिती विनाविलंब सादर करण्याची सूचना देण्यात आल्या.
नोडल अधिकारी विजय देशमुख, सहायक नोडल अधिकारी दिनेश मेतकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल खानजोडे तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी, सहकारी पतसंस्थांचे सह निबंधक आदी यावेळी उपस्थित होते.