विद्यापीठाची उन्हाळी-2025 बी.व्होक. सेमि-6 (सी.जी.एस.)पूनर्परीक्षा 23 जून रोजी होणारविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी – 2025 बी.व्होक. सेमि.-6 (सी.जी.एस.) इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन अॅन्ड मॅनेजमेंट विषयाची पूनर्परीक्षा विद्याथ्र्यांना पूर्वी दिलेल्या केंद्र क्र. 116,126,204,301, 701 व 712 या केंद्रांवर दि. 23 जून, 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.