अमरावती शहरात वीजपुरवठा समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक – तातडीने उपाययोजनांचे आदेश!
अमरावती : अमरावती शहरातील महावितरण विभागाशी संबंधित तांत्रिक व नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक महावितरण कार्यालयात पार पडली. शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर, जुनाट वाहिन्यांची दुरवस्था, अनियमित वीजबिलिंग आणि झोपडपट्टीतील वीजजोडणीसंबंधी समस्या या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
मुख्य मुद्दे व निर्णय:
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर उपाययोजना
जुनाट व धोकादायक वीज वाहिन्यांची दुरुस्ती
ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याचे आदेश
चुकीची वीजबिल आकारणी थांबविण्यासाठी यंत्रणा सुधारणा
नवीन वसाहतींसाठी सबस्टेशन आणि वीजजोडणीबाबत तातडीने निर्णय
औद्योगिक वसाहतींसाठी दर्जेदार आणि स्थिर वीजपुरवठ्याची व्यवस्था
अपघातग्रस्त वीजखांब आणि लोंबकळणाऱ्या तारा त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश
शहरात प्रस्तावित नवीन ५ ट्रान्सफॉर्मरसाठी जागा निश्चितीचे निर्देश
या बैठकीत नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून संबंधित विभागांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले व मिलिंद चिमोटे, तसेच महावितरणचे कार्यकारी व अधीक्षक अभियंते. यांच्यासह विनोद मोदी, प्रमोद पांडे, भैय्यासाहेब निचळ, सलीम मिरावले, देवयानी कुर्वे, विजय वानखेडे, गजानन जाधव, सतीश मेटांगे, डॉ. मतीन अहेमद, प्रा. बी.टी. अंभोरे, अमर देशकर, अज्जू ठेकेदार, कलीम शाह, अनिकेत क्षीरसागर, मयूर निंबोरकर, प्रथमेश गावंडे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते.