विद्यापीठाची उन्हाळी-2025 बी.एस्सी. सेमि-6 (सी.बी.सी.एस.) रसायनशास्त्र विषयाची,पूनर्परीक्षा 17 जून रोजी होणार विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी – 2025 बी.एस्सी. सेमि.-6 (सी.बी.सी.एस.) रसायनशास्त्र विषयाची पूनर्परीक्षा ब्रिाजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय (केंद्र क्र.125) या केंद्रांवर दि. 17 जून, 2025 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.