LIVE STREAM

Maharashtra Politics

निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. माहिम मतदार संघातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पण एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अमित ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते. दरम्यान अमित ठाकरेंविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,सचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगमजी यांची भेट घेतली आणि यासंदर्भात तक्रार दाखल केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्क,दादर येथे दिपोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात आली. ही देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!