LIVE STREAM

Uncategorized

मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या ट्रॅव्हल्स वर समोरून येणारी ट्रॅव्हल्स धडकली या अपघातात उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सचा चालक जागीच ठार झाला. शनिवारी रात्री दोन वाजताची हि घटना आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयल ट्रॅव्हल्सची बस अमरावतीहून पुण्याला जात असताना या बसचा टायर धनज गावानजीक पंक्चर झाला वाहक टायर बदलवत असताना समोरून येणारी खुराना ची ट्रॅव्हल्स उभ्या गाडी वर धडकली हि गाडी नांदेड येथून नागपूरकडे जात होती भरधाव गाडीची धडक इतकी भीषण हो ती कि रॉयल ट्रॅव्हल्सच्या चालक अमरावतीच्या हनुमान नगर येथील रहिवासी श्रीधर पुंडलिक तायवाडे हा जागीच ठार झाला भाऊबीज साजरी करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाची मोठी गर्दी सध्या आहे ट्रायल आणि खुराना या दोन्ही खासगी बसेस प्रवाशांना घेऊन विरुद्ध मार्गाने जात होत्या बसमधील सारे प्रवासी गाढ झोपेत असताना भरधाव असलेल्या बसने धडक दिली या भीषण अपघातात एक ठार तर दोघांची प्रकुर्ती चिंताजनक आहे. दोन्ही बस मधील १५ प्रवाशी जखमी झाले आहे ,भीषण अपघातामुळे रस्त्यावर काही वेळ ट्राफिक जाम झाली होती. मूर्तिजापूर पोलिसांनी धावपळ करून जखमींना बाहेर काढलं झोपी गेलेले प्रवाशी अचानक जागे झाले आणि खळबळ उडाली काही जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे भाऊबीजेच पर्व साजरं करण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरु आहे बसचालकाच्या जीवावर निश्चितपणे प्रवास करणारे प्रवासी या घटनेने धास्तावले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!