हरिसाल गावात पुन्हा एकदा वाघाने माणसाची शिकार केल्याची भयप्रद घटना
जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेलेल्या बापबेट्यावर वाघाने हल्ला केला हरिसाल गावातील हि हृदयद्रावक घटना आहे वाघाने ज्याची शिकार केली त्याच नाव हरिराम गंगाराम धिकार आहे हरीसाल गावापासून 2km दुअंतरावर असलेल्या जंगलात वाघाने शिकार केली व दूर जंगलातील गुहेत घेऊन गेला केसरपूर गावातील रहिवासी हरिराम गंगाराम धिकारी हा गावकऱ्यांसोबत लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रविवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजेची हि घटना आहे त्याच्यासोबत असलेले गावकरी कसेबसे आपला जीव वाचवून गावात पळाले त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली असता गावकर्यांनी जंगलाकडे धाव घेतली जनप्रतिनिधीही येथे पोचले गावकऱ्यांसोबत आ. राजकुमार पटेल यांनीही घटनास्थळी धाव घेतली त्याच्या सोबत हरिसाल ग्रामपंचायतीचे सरपंच विजय दर्सिंबे,उपसरपंच गणपत गायन, मेंबर संतोष सालेम, प्रवीण पंडोले, अमित पडोकर हे होते पुन्हा एकदा गावकरी वाघाच्या भक्ष्यस्थानी पडलाय गेल्यावेळीही वाघाने शिकार केली होती त्याचं नावही हरिराम होतं रविवारी ज्याच्यावर हल्ला झाला तोही हरिरामच होता