जनतेच्या वाढत्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला मतदान करीत लोकसेवेची संधी द्या-आ.सौ.सुलभाताई खोडके
शासन,सामाजिक प्रगती,आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता यातूनच सर्वसमावेशक विकास साधणार-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके..
संघटनात्मक कौशल्याचा परिचय,विकासाचा रोडमॅप,वंचित घटकांना समान संधी देण्याची ग्वाही देत आशीर्वाद पदयात्रेची आगेकूच सुरू..
प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी आणि त्याला आरोग्यपूर्ण आयुष्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके
जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी याची जवाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांचा सौ.सुलभाताई खोडकेंना लक्षवेधी प्रतिसाद..
अमरावती -३नोव्हेंबर- :- संघटनात्मक कौशल्ये,नागरिकांच्या हितावह उपक्रमांच्या तपशीलाकडे बारकाईने लक्ष,लोकसेवेचा सातत्यपूर्ण ध्यास,पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उपलब्धता,भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची अविरतपणे तळमळ,आदींसह ज्येष्ठांच्या आशिर्वाद रुपी पाठबळातून व महिलाशक्तीच्या साथीने महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांची आशीर्वाद पदयात्रा अमरावती शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. भारतीय संविधान हे सर्वसमावेशक शासनाच्या भावनेचे भक्कम उदाहरण आहे. ते सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन करते. समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यावर आपला भर आहे.सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि संपर्क माध्यमे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली असताना जनतेच्या वाढत्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.अमरावती शहराच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनात सुशासन,सामाजिक प्रगती,आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता यासह विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून त्याला मूर्तरूप देण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वांनी आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला बहुसंख्येने मतदान करीत नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावी.असे विनंतीपूर्ण आवाहन महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी मतदात्यांना केले.अमरावती शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा आलेख जनतेसमोर ठेऊन यावेळी नागरीकांशी त्यांचा सातत्याने संवाद साधला जात आहे.दैनंदिन भेटीगाठीतून गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग,युवक-युवती यांना विश्वासात घेऊन त्यांची दिनश्चर्येनुसार या पदयात्रेत अविरतपणे वाटचाल सुरू आहे.शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी नागरिकांचे पाठबळ लाभल्याने आपण विकासकामांची गतीने पूर्तता करू शकलो.ही बाब अधोरेखित करताना समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करण्यासह समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.असा विश्वास व्यक्त करीत आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडकें द्वारे आपल्या वाढत्या जनसंपर्कावर अधिकाधिक भर दिला जात आहे.यासोबतच शहराचे आरोग्य हे त्याच्या समृद्धीचा पाया असतो,असा दृढ विश्वास व्यक्त करीत शहराची निरोगी जनता ही त्या शहराची वृद्धी,उत्पादकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना यामध्ये योगदान देण्यासाठी अधिक सक्षम असते.याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधून आपण सर्वसमावेशक ,सुलभ आणि सर्वांची काळजी घेणारी अशी आरोग्यसेवा व्यवस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,असा निर्धार यावेळी महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.सर्व नागरिकांना विशेषतः सर्वाधिक दुरबल घटकांतील व्यक्तींना समन्यायी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे त्यांनी विविध ठिकाणी जाऊन जनआशीर्वाद पदयात्रेत तसेच बैठकीत व गृहभेटीतून नागरिकांशी हितगुज करतांना सांगितले. आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी आपण सर्वांनी आपले मतदान मला करून नागरिकांच्या सेवेची संधी देऊन उपकृत करावे,असे विनंतीपूर्ण आवाहनही यावेळी महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडकेंनी यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधवांना केले.