LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची व्याप्ती,लाभार्थींचे यश हे प्रत्येकांपर्यंत पोहोचावे यासाठी कटिबद्ध – महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके

शहरी विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्नरत -आ. सौ.सुलभाताई खोडके

समाजाभिमुख कार्य करण्याची क्षमता बाळगणाऱ्या महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंच्या आशीर्वाद पदयात्रेत नागरिकांचा अधिकाधिक संख्येने सहभाग

संघटन कौशल्याची हातोटी-सहकार्यवृत्ती-प्रामाणिक प्रयत्न-पारदर्शी वर्तन-नागरिकांचे आशीर्वादाचे पाठबळाची आ.सुलभाताई खोडकेंच्या पदयात्रेत स्थानिकांनी अनुभवली अनुभूती

स्वच्छ, आरोग्यदायी व शाश्वत शहरी लँडस्केपसाठी प्राधान्याने कार्यरत -महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके

अमरावती – अमरावती शहरात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक  विकास कामे,अंतर्गत रस्ते,शहरातील वाहतुकीशी संबंधित बाबी,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे,उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास,उद्योगांच्या समस्या,पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास करणे यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.भूमिका व्यक्त करीत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी न्यू हनुमान नगर-गोपी कॉलोनी येथील नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा,समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.शहराचा आर्थिक आणि औद्योगिक विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे याला आपले सर्वतोपरी प्राधान्य असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. आशीर्वाद पदयात्रेत सहभागी झालेल्या स्थानिकांशी मुक्त संवादातून आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी आपली नागरिकांच्या हित सरंक्षण-संवर्धनासाठी आपली कटीबद्धता स्पष्ट केली.अमरावती शहराचा पर्यावरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या अधिक विकास साधायचा आहे.त्यामुळे हवा,जमीन आणि पाण्याची गुणवत्ता राखून विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.लोकांसाठी चांगले जीवन सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत विकसित शहराच्या प्रवासात पर्यावरणाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.अशी वचनबद्धता व्यक्त करीत त्यांनी स्थानिक नागरिकांना आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला बहुसंख्येने मतदान करीत जनसेवेची संधी द्यावी,असे त्यांनी यावेळी विनंतीपूर्ण आवाहनही केले. यासोबतच घनकचरा व्यवस्थापन सुधारणे,कचरा निर्मूलन आणि शाश्वत जीवनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून शहरी भागाचा कायापालट करण्याच्या दिशेने आपण सातत्याने प्रयत्नशील राहू,असा विश्वास यावेळी आ.सुलभाताई खोडके यांनी राममोहन नगर-सुरभि विहार येथील नागरिकांसमक्ष व्यक्त केला.गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने बार्टी,सारथी,महाज्योति, लिडकॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत.या योजनांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणे,एव्हढेच लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची व्याप्ती,लाभार्थीचे यश हे प्रत्येकांपर्यंत पोहोचावे व इतर विद्यार्थ्यांनाही लाभ घेता यावा,यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.प्रत्येकावर समाजाचं काही ऋण आहे.कर्तव्य भावनेने त्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणे,यासारखा आनंद नाही.या भावनेतून आपण जनतेनी लोकसेवेची संधी दिल्यावर २०१९ ते २०२४ दरम्यान विकासकामांची गतीने पूर्तता करण्यावर वेळोवेळी भर दिला. अमरावती शहरातील नागरिकांच्या गृहनिर्माण गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण यापूर्वी मतदानाचे आशीर्वादरुपी पाठबळ दिले आहे, तीच मतदानरुपी शक्ती मला यथावत देत जनसामान्यांच्या सेवेचा वसा अविरतपणे चालविण्यासाठी बळ द्यावे,आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी आपले बहुमूल्य मतदान करीत मला लोकसेवेची पुनःश्च संधी द्यावी,अशी विनंती पाठ्यपुस्तक मंडळ परिसर व श्रीकृष्ण नगर येथील नागरिकांना यावेळी महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी विनंती केली.या आशीर्वाद पदयात्रे-दरम्यान आ.सौ.सुलभाताई खोडके यांची समाजाभिमुख कार्य करण्याची क्षमता, निष्ठेने सार्वजनिक हिताच्या कामात सहभागी होण्याची इच्छा,स्वतःवर आलेली कामाची जवाबदादारी पेलत असतांना पूर्ण विश्वासाने निर्णय घेणे आणि प्रामाणिकपणे नेटाने आणि निष्ठेने जनहिताच्या कामासाठी झोकून देणे या त्यांच्या कर्तृत्वाचे पैलू लक्षात घेता, आशीर्वाद पदयात्रेत शहरवासीयांचा दिवसागणिक सहभाग अधिकाधिक संख्येने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या आशीर्वाद पदयात्रेत न्यू हनुमान नगर,गोपी कॉलोनी,राममोहन नगर,सुरभि विहार,श्रीकृष्ण नगर -मिलिंद कॉलोनी येथील ज्येष्ठ नागरिक-महिला भगिनींसह -युवक बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!