श्री क्षेत्र वायगाव येथून यशोमती ठाकूर यांच्या प्रचार यात्रेचा शुभारंभ
ॲड. यशोमती ठाकूर या श्री.क्षेत्र वायगाव येथून प्रचाराचा मंगळवार दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता श्रीगणेशा करणार आहेत. सिद्धीविनायक मंदिर श्री क्षेत्र वायगाव येथे सकाळी अभिषेक करून ॲड. यशोमती ठाकूर प्रचाराचा नारळ फोडतील. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या वायगाव येथून प्रचार यात्रेला प्रारंभ केल्यानंतर ॲड. यशोमती ठाकूर आजपासून प्रचाराला सुरुवात करतील.
महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवीत आहेत. सलग चौथ्यांदा त्या या मतदार संघातून विजयश्री मिळवतील असे वातावरण मतदार संघात आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या प्रचार यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असणार आहे. वायगाव येथून प्रचाराला प्रारंभ झाल्यानंतर तेथून आष्टी, टाकरखेडा, साउर ,पूर्णानगर या गावातून प्रचारयात्रा निघणार आहे. या दरम्यान ॲड. यशोमती ठाकूर या नागरिकांशी संवाद साधून मतदारांना मोठा विजय मिळवून देण्यासाठी आवाहन करणार आहे.
ॲड. यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदार संघात मोठी विकासकामे केली आहेत. तिवसाच नव्हे तर जिल्ह्यात विकासाची गंगा आणणाऱ्या ॲड. यशोमती ठाकूरांना मोठया मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी नागरिकांनी संकल्प केला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराला केवळ पंधरा दिवस मिळणार असल्याने कमी वेळेत मतदार संघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी ॲड. यशोमती ठाकूर यांचा प्रयत्न असणार आहे.
तिवसा विधानसभा मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून मतदार संघाचा कायापालट करणाऱ्या ॲड. यशोमती ठाकूर यांना मतदार संघातील जनता पुन्हा संधी देणार असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. मंगळवारी श्री क्षेत्र वायगाव या ठिकाणी श्री.सिद्धीविनायकाचे मनोभावे दर्शन करून ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रचारकार्याला प्रारंभ होणार आहे.या प्रचारयात्रेला परिसरातील तसेच मतदार संघातील नागरिकांनी तसेच महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.