पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनी अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना केले मतदानाचे आव्हान
भारत निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांनी पीडब्ल्यूडी (person with disable) स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून श्रीमती. जया राऊत मॅडम सहायक नोडल अधिकारी श्री. राजेंद्र जाधवर, श्री. डी. एम. पुंड, श्री. पी. डी. शिंदे, श्री. पवन साबळे, श्री. भारत राऊत, श्रीमती. शालिनी गायबोले, श्री. उमेश धुमाळे, श्री. आशिष चुनळे, श्री. पंकज मुदगल व श्री. निरज तिवारी यांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्फत संपूर्ण जिल्हाभर दिव्यांग मतदानाची टक्केवारी वाढावी व दिव्यांगांना सुलभ व सुगमरित्या मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोगाचे दिशा निर्देशानुसार कार्य केले जात आह. याचाच एक भाग म्हणून आज सहाय्यक नोडल अधिकारी श्री. पंकज जी. मुदगल व श्री. निरज तिवारी यांनी पद्मश्री शंकर बाबा पापडकर यांची वझर येथे जाऊन भेट घेतली व अमरावती जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी मतदान करावे जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदाना करिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आव्हान करावे म्हणून विनंती केली बाबांनी त्यांच्या विनंतीला “ते माझे कर्तव्य आहे, मी नक्कीच दिव्यांगांना मतदानाकरिता प्रेरित करेल व लोकशाही बळकट करण्याकरिता आपले शक्य तेव्हढे योगदान देईल.”असे विचार मांडले जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील सर्व दिव्यांगांनी जरूर मतदान करावे असे आवाहन यावेळी बाबांनी आपल्या शेरोशायरी द्वारे सर्व जनतेला व दिव्यांगांना मतदान करण्याबाबत केले त्याचबरोबर पीडब्ल्यूडी अंतर्गत अमरावती जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या कार्याची सुद्धा बाबांनी फार स्तुती करत सर्व प्रकारच्या दिव्यांगांना कळेल अशा पद्धतीने तज्ञांद्वारा प्रत्येक तालुकास्तरावर घेतल्या जाणाऱ्या ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा अतिशय फायदेशीर आहेत यामुळे दिव्यांग मतदाराला कुठल्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणे ईव्हीएम मशीन वर आपले मत कसे नोंदवायचे हे कळते व तो स्वतंत्रपणे मतदान करू शकतो ज्यामुळे त्याला आपल्या मतदानाची संपूर्ण गोपनीयता राखता येते असे मत बाबांनी प्रगट केले, करिता या होणाऱ्या कार्यशाळेस सर्व दिव्यांगांनी उपस्थित राहावे असे सुद्धा आव्हान बाबांद्वारे करण्यात आले. यासाठी तज्ञ मार्गदर्शक श्री. पंकज जी. मुदगल व श्री. निरज तिवारी यांचे अभिनंदन सुद्धा केले. या भेटी वेळी त्यांच्यासोबत त्यांची मानसकन्या कु. गांधारी सुद्धा उपस्थित होती तिने सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्याबाबत आव्हान केले आहे यावेळी ती म्हणाली “ मी दिव्यांग असून मी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान करणार आहे, आपणही जरूर मतदान करावे व लोकशाहीला बळकट करावे.” त्याचबरोबर बाबांनी पीडब्ल्यूडी द्वारा जिल्ह्यात आयोजित ज्या कार्यक्रमाला बोलावल्या जाईल त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
दिव्यांग मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता पद्मश्री शंकर बाबांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल सहाय्यक नोडल अधिकारी श्री. पंकज जी. मुदगल यांनी पीडब्ल्यूडी च्या संपूर्ण टीमच्या वतीने आभार व्यक्त केले.