सुलभाताई खोडके यांची आशीर्वाद पदयात्रा ठरली जनतेची पहिली पसंती
६नोव्हेंबर-अमरावती शहरात सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम शहरी भागातील समस्या जाणून घेत आपण दर्जेदार रस्ते बांधकाम करणे, प्रभागा-प्रभागात अंतर्गत रस्ते बांधकाम करण्यासह यासोबतच सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक व सर्वोत्तम शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच आज उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणून आज मनपाच्या शाळा ओळखल्या जात आहे.वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण,वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होऊ नये, याकरिता राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम राबविण्यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.समाजकारण,राजकारण आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांत मानवी संबंध हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.यापूर्वी अमरावतीकरांनी मला गत निवडणुकीत भरघोस प्रतिसाद देत मतदान करीत २०१९ ते २०२४ करिता लोकसेवेची संधी दिली होती.जनतेनी माझ्यावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवीत आपण सामाजिक संवेदनशीलता,समाजाप्रती जागरूकता आणि समाजाप्रती जवाबदारीची जाणीव बाळगून जनसेवेची कामे करण्यासह कोट्यवधी रुपयांची विकासकामांची पूर्तता केली.हाच विश्वास व आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवून जेणेकरून समाजऋण फेडण्याचे कार्य निरंतर सुरू राहावे यासाठी आपण सर्वांनी आगामी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर-२०२४ रोजी घड्याळ या चिन्हासमोरील क्रमांक-४ चे बटन दाबून मला बहुसंख्येने मतदान करीत लोकसेवेची संधी द्यावी,३८-अमरावती विधानसभा निवडणुक -२०२४ करिता महायुतीच्या अधिकृत उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडकेंनी असे विनंतीपूर्ण आवाहन यावेळी समाधान नगर-खापर्डे बगीचा-लोकमान्य कॉलोनी परिसर स्थित स्थानिक नागरिकांना केले.मतदान प्रक्रियेत तरुणाईचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तरुणांमध्ये विचारांची नविनता आणि बदलाची जाणीव अधिक असते.आजची तरुणाई सुशिक्षित आणि जागरूक असून ,त्यांना देशाच्या विकासात योगदान देण्याची ही एक अमूल्य संधी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक-युवतींनी मोठया प्रमाणात मतदान करून -आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत उत्कृष्ट सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वोदय कॉलोनी-आदिवासी कॉलोनी येथील मतदात्यांना केले.मनाची तीव्र इच्छाशक्ती आणि प्रयत्नांचे सातत्य तसेच विकासकामांची पूर्तता करण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून समतोल आणि नीती मूल्यांशी,जीवनमूल्यांशी सुसंगत राखीत सकारात्मकतेचा ध्यास बाळगून महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांची आशिर्वाद पदयात्रा अमरावती शहरात विविध ठिकाणी वाटचाल करीत आहे.सामाजिक जवाबदारी-स्वावलंबन-पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त शहर-युवाशक्तीच्या सर्जनशीलततेचा वापर-सेवा कार्यासोबतच सामाजिक,सांस्कृतिक-शैक्षणिक आणि राजकीय जीवनातील चढता आलेख तसेच आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी जनसेवेसाठी बाळगलेला दुर्दम्य आत्मविश्वास, संघटन कौशल्य,योग्य निर्णयक्षमता आणि माणसे जोडण्याची कला आदी बाबी लक्षात घेता, महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशिर्वाद पदयात्रेत जनसामान्यांच्या वाढता लक्षवेधी सहभाग हा त्यांच्या यशस्वी नियोजन व नेतृत्व कौशल्याची साक्ष देणारा ठरत आहे.सहयोग,समन्वय आणि क्षमता बळकटीकरणासाठी सर्वशक्तीनिशी समर्थन देत सुलभाताई खोडकेंच्या या आशीर्वाद पदयात्रेला स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला जात आहे.कौशल्य व ज्ञान देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. औद्योगिक विकासाला गती प्राप्त व्हावी,औद्योगिक उत्पादन वाढावे,त्याला उत्तेजन मिळावे व साहाय्य व्हावे या हेतूने युवक-युवतींना आवश्यक असलेले पायाभूत शिक्षणाचा त्यांना लाभ व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तसेच प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ययुक्त करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदल होत आहेत.तसेच औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये असलेली तांत्रिक मनुष्यबळाची मागणी लक्षात घेता,गरजूंना तांत्रिक शिक्षणाचा पुरेपूर लाभ व योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे,यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ अंतर्गत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.असा विश्वास यादरम्यान महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी यावेळी आदर्श नेहरू नगर-पंचशील नगर येथील नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केला.या आशीर्वाद पदयात्रेत समाधान नगर-खापर्डे बगीचा-लोकमान्य कॉलोनी-सर्वोदय कॉलोनी-आदिवासी कॉलोनी-आदर्श नेहरू नगर-पंचशील कॉलोनी येथील ज्येष्ठ नागरिक-महिला भगिनींसह युवक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते