श्री. क्षेत्र जहागीरपूर येथून यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात
महाविकास आघाडीच्या उमेदवार लोकनेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचा दुसरा दिवस श्री क्षेत्र जहागीरपूर येथून सुरू झाला. मारोतीरायचे दर्शन घेऊन जहागीरपूर येथून प्रचारयात्रा आज काढण्यात आली. या प्रचारयात्रेत तिवसा मतदार संघातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग घेत यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत केले. पुष्पवर्षाव करून यशोमती ठाकूर यांच्या पदयात्रेत महिलांनी मोठ्या संख्यने प्रचाराची धुरा सांभाळली.
तिवसा विधानसभामतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षावर निवडणूक लढवीत आहे. त्यांनी आपल्या प्रचाराच्यादुसऱ्या दिवशी जहागिरपूर, कौडण्यपूर, जुनी शिदवादी, वंडली, शिदवादी, मूर्तिजापूर, धामंत्री, उंबरखेड, मारडा, काळा घोटा, कवाडगव्हाण, शेंदुरजना महोरा, घोटा, भिवापूर, विरगव्हान या गावातून पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला.गावागावातून महिला, युवतींनी मोठ्या प्रमाणात यशोमती ठाकूर यांचे स्वागत केले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतांना यशोमती ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याने परिसरातील नागरिकांनी हा विकासाचा झंझावात अविरत राहण्यासाठी पुन्हा यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला. परिसरातील सर्वच तीर्थस्थळाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून यशोमती ठाकूर यांनी धार्मिक स्थळांचा विकास केला. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून भविष्यात आणखी मोठा विकास करण्याचा मानस यशोमतीठाकूर यांनी व्यक्त केला.
या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप राऊत, भूषण यावले, विलास माहूरे,प्रवीण मनोहर, तेजस्वीनी वानखडे, दिलीपराव शापामोहन, महादेवराव गारपवार, आसावरी देशमुख, सुनील किरटकर, दिलीप नहाटा, नरेंद्र राऊत, प्रकाश मक्रमपुरे, संजय मार्डीकर, सुरेश मेंटकर, रवी राऊत, सुरेश धवणे,शिरीष मोहोड, अभिजित बोके, सतीश पारधी, दिलेलं काळबांडे,मुकुंद देशमुख,रमेश कलाने, चंदूभाऊ वडस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.