LIVE STREAM

Education NewsLatest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये आपत्ती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये आव्हान-2024 चान्सलर्स ब्रिागेड या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे दि. 07 ते 16 नोव्हेंबर, 2024 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. शिबीरामध्ये महाराष्ट्रातील 23 विद्यापीठांमधील 604 मुले व 444 मुली असे एकूण 1048 रा.से.यो. स्वयंसेवक व प्रत्येक जिल्ह्रांचे दोन चमू व्यवस्थापक (एक महिला व एक पुरुष) सहभागी होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन हा विषय आज महत्वाचा झाला आहे.  कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी आमचा विद्यार्थी सक्षम असला पाहीजे यादृष्टीने प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी प्रशिक्षित होत आहे, त्याचा निश्चितच भविष्यात आपत्ती निवारणासाठी समाजाला उपयोग होणार आहे.  या महत्तम उद्देशाने महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपतींनी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांंतील विद्याथ्र्यांसाठी सुरू केला आहे.

उद्घाटन समारंभ
शिबिराचे उद्घाटन आज सायंकाळी 5.00 वा. होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, उद्घाटक म्हणून एन.डी.आर.एफ., पुणे येथील श्री संतोष सिंग, प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शहर पोलीस आयुक्त श्री नविनचंद्र रेड्डी, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, श्री भैय्यासाहेब मेटकर, डॉ. व्ही.एच. नागरे, डॉ. नितीन चांगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
प्रवास व्यवस्था
बाहेर ठिकाणावरुन येणा-या चमूंची ने-आण करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या 06 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सदर बसेस बडनेरा स्टेशन, अमरावती रेल्वे स्टेशन व बसस्थानक इत्यादी ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
निवासाची व्यवस्था
वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आलेल्या मुली, महिला व चमू व्यवस्थापक यांची निवासाची व्यवस्था ही परिक्षक वसतीगृह व पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन संशोधक आणि पदव्युत्तर  विद्यार्थी वसतीगृह, तर मुलांची व पुरुष चमू व्यवस्थापक यांची व्यवस्था भौतिकशास्त्र विभागामध्ये करण्यात आली आहे.
प्रशिक्षण व्यवस्था
विद्याथ्र्यांच्या विविध सत्राकरीता मार्गदर्शक म्हणून पुणे येथील एन.डी.आर.एफ. च्या वतीने 35 मार्गदर्शकांची व्यवस्था करण्यात आली असून विद्याथ्र्यांना पूर, आग तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याकरीता विद्यापीठाचे 06 सभागृह उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सभागृह, श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन सभागृह, वनस्पतीशास्त्र विभाग सभागृह, प्राणीशास्त्र विभाग सभागृह, दृकश्राव्य सभागृह/ए.व्ही. थिएटर, ग्रंथालय सभागृह इ. चा समावेश आहे.
तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठाचे क्रीडा संकुल व विद्यापीठ तलाव आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

शिबीराचे वेळापत्रक
  दि. 08 नोव्हेंबर रोजी रक्तस्त्राव थांबविणे आणि जखमेची काळजी घेणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राथमिक संकल्पनना इ. विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 09 नोव्हेबर रोजी आपत्ती पूर्वतयारी, बेसिक लाईफ सपोर्ट आणि सी.पी.आर. रुग्णांचे वहन इ. विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 10 नोव्हेंबर रोजी सर्पदंश व प्राणीदंश प्रथमोपचार, वादळ, ढगफुटी, विजांचा कडकडाट, कोरडा दुष्काळ, उष्माघात आणि थंडीच्या लहरी इ. विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 11 नोव्हेंबर रोजी स्नायू व हाडांची दुखापत, रुग्णांचे वहन, काळजी व स्थलांतरण इ. बाबत घ्यावयाची काळजी या विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 12 नोव्हेंबर रोजी आग, वणवा, भूकंप, भूस्खलन इ. पासून आपला व इतरांचा बचाव आदी विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 13 व 14 नोव्हेंबर रोजी पूराची कारणे, आपली व इतरांची काळजी, दोरी व दोरीच्या गाठी बांधण्याचे विविध प्रकार या विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 15 नोव्हेंबर रोजी समुदाय स्तरावर प्रथमोपचार, त्सुनामी, रासायनिक आपदा, जैविक आपदा, रेडिओलॉजिकल आणि न्युक्लिअर आपदा इ. विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबीराचा समारोप
दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 08 वा. आपत्ती पूर्व प्रशिक्षण शिबीराचा समारोप कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता मोहपात्रा, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर.डी. सिकची, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. विद्या शर्मा उपस्थित राहणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!