दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ ज्युडो (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित
अमरावती (दि. 08.11.2024) – एल.एन.सी.टी विद्यापीठ, भोपाळ येथे 22 ते 25 नोव्हेंबर, 2024 दरम्यान होणा-या दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ ज्युडो (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
चमूमध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. ज्ञाने·ारी सालेकर, बी.बी. आर्टस्, एन.बी. वाणिज्य व बी.पी. विज्ञान महाविद्यालय, दिग्रसची कु. अ·िानी जाधव, श्री एल.आर.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. ऐ·ार्या घुगरे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची कु. दिपाली डोंगरे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. श्रावणी साखरे, श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूरची कु. अनुश्री सूर्यवंशी व जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरची कु. सपना बाकोडे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 10 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.