LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra Politics

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सक्रीय सहभागी नोंदवा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

–        अमरावती, दि. 9 : लोकसभा निवडणुकीत प्रशासन, नागरिक आणि संस्थांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात आली. याचा परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारीत तीन टक्यां्कनी वाढ झाली. सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. या विधानसभा निवडणुकीतही सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

नियेाजन भवनात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त कल्पना बावरकर, कौन बनेगा करोडपतीच्या विजेत्या बबीता ताडे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, लोकसभा निवडणुकीत संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. यातून मतदारांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य करण्यात आले. इतर ठिकाणी कमी मतदान झालेले असताना आपल्या जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली हे स्वीप उपक्रमांचे यश आहे. समाजातील युवक, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी अशा सर्व घटकांना उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.

ग्रामीण भागात 75 टक्के मतदान होत असताना या तुलनेत शहरी भागात मतदान होत नाही. यावेळी प्रामुख्याने शहरी भागामध्ये लक्ष केंद्रीत करून जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच कमी मतदान झालेल्या मतदान क्षेत्रामध्येही स्वीपचे उपक्रम जाणीवपूर्वक राबविण्यात येणार आहे. जनजागृतीसोबतच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पाणी, स्वच्छता, बसण्याची सोय आदी बाबींवर लक्ष देण्यात येणार आहे. मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी वोटर स्लीप देण्यात येत आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती आणि याठिकाणी योग्य सुविधा मिळाल्यास मतदानाचा टक्का निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी, जनजागृतीसाठी गावपातळीवरही उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना चांगला अनुभव येण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त श्री. कलंत्रे यांनी, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यात खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सवलत आणि पगारी सुट्टी देणे, मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर आदी सुविधा देण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीसाठी दि. 11 नोव्हेंबर रोजी रॅली काढण्यात येणार असून यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. खाते यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!