LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

रुक्मिणी नगर परिसरामध्ये डॉ. सुनील देशमुख यांच्या पदयात्रेने परिसर काँग्रेसमय

तीस वर्षाच्या राजकारणात प्रामाणिकपणे  केवळ जनतेसाठी केलेल्या विकास कामांच्या बळावरच आपला विजय होणार डॉ..सुनील देशमुख

विकास पुरुषाच्या मागे लोटला जनसागर 

अमरावती विधानसभेचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांचे प्रचारार्थ रुक्मिणी नगर परिसर येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांचे प्रचार पद यात्रेला मिळणारे समर्थन ही जणू विजयाची नांदी ठरावी इतके अनमोल आहे. ठिकठिकाणी मातृशक्ती, ज्येष्ठ नागरिक यांनी  डॉ. सुनील देशमुख यांचे औक्षवंत करून त्यांना विजयाकरिता शुभ आशीर्वाद दिले. शहरातील विविध भागात होत असलेल्या भव्य पदयात्रांमुळे संपूर्ण परिसर काँग्रेसने झालेला आहे. चहू बाजूंनी काँग्रेस पक्षाचे विजयी चिन्ह पंजाची घौडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे.

डॉ.सुनील देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात अमरावती शहराचा बदललेला चेहरा मोहरा, पायाभूत सुविधांमध्ये निर्माणमध्ये केलेली भक्कम कामे, संपूर्ण शहरातील मुख्य  दीर्घ काळ टिकणाऱ्या काँक्रीटर्स रस्त्यांचे निर्माण, वाढीव पाणीपुरवठा टप्पा, उन्नत विद्युत व्यवस्थेसाठी 100 कोटी रुपयांची आयपीडीएस योजना,उन्नत आरोग्य व्यास्थेकरिता  सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चे निर्माण,शहरतील उड्डाण पुलाचे निर्माण, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रि – आयएएस कोचिंग सेंटर विकास हाच केंद्रबिंदू मानून आजवरची केलेली राजकीय वाटचाल याच्या भक्कम पाठबळावर डॉ.सुनील देशमुख यांचे उमेदवारी जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय होत आहे. नागरिकांचाही यांच्या पदयात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून ठीक ठिकाणी या पदयात्रेंचे स्वागत करण्यात येत आहे. आज सकाळी काँग्रेस भवन शामनगर चौकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली पुढेही पदयात्रा श्याम नगर, राजेंद्र कॉलनी, परिसर मार्गे रुक्मिणी नगर मार्गे हमालपुरा चीचफैल इथून मार्गस्थ होत गणपती मंदिर येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये  सामील होऊन डॉ.सुनील देशमुख यांना आपला भक्कम पाठिंबा दर्शविला. या पदयात्रांच्या धडाक्याच्या माध्यमातून डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रामाणिक राजकीय वाटचालीवर नागरिकांनी शिक्कामोर्तबच केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!