LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

संतभूमीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्याकरिता मी आलेली आहे- महायुती उमेदवार सौ. सुलभताताई खोडके 

गाडगे नगर ,राधा नगर-सदिच्छा कॉलोनी-विनायक नगर-नारायण नगर-प्रेरणा कॉलोनी-भाऊ कॉलोनीमध्ये महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडकेंच्या आशीर्वाद  पदयात्रेने सर्वत्र घड्याळमय वातावरण..

आगामी काळातही अमरावतीचा विकास अखंडपणे प्रवाहित होत राहण्यासाठी संधी द्यावी-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई  खोडके..

भविष्यात अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी जनतेनी मतदान-आशिर्वादरुपी पाठबळ द्यावे-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांचे विनंतीपूर्ण  आवाहन..

 एकता महिला मंडळ-पलाश लाईन-संजीवनी कॉलोनी-पूनम फोटो स्टुडिओ लाईन येथे आशीर्वाद पदयात्रेत महिलाशक्ती व युवाशक्तीचा स्वेच्छा सहभाग..

अमरावती दिनांक-१०नोव्हेंबर- 
अमरावतीकरांना स्वच्छ हवा आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्धता, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा  पुनर्वापर व्हावा,जमिनीवरील जलस्रोत अतिक्रमणमुक्त व प्रदूषणमुक्त करणे,भूगर्भाची पातळी खालावत असून,ती सुधारण्यासाठी देखभाल यंत्रणा कार्यान्वित करणे,आदी बाबींची पूर्तता करण्यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.यासोबतच अमरावती शहरातील सर्व इमारतींवर पर्जन्यजल पुनर्भरण करण्यास प्राधान्य देणे,हवेतील कर्बवायू अधिक शोषला जावा,यासाठी प्रभागा-प्रभागात वृक्षलागवड करणे तसेच सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी हरित व पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य देणे,कचरा समस्या कमी करण्यासाठी खत प्रकल्प राबविणे त्याकरिता व्यवस्थापन यंत्रणा अत्याधुनिक करणे यासोबतच रस्त्यांवरील गटारीमध्ये शोष खड्डे करून वाहणारे पाणी भूजलात जाण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राधा नगर-सदिच्छा कॉलोनी-विनायक नगर-नारायण नगर येथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.गतवेळी जनतेनी संधी दिल्यामुळे आपण २०१९ ते २०२४ दरम्यान अमरावतीच्या विकासाचे चक्र गतिमान करीत विकास करू शकलो.त्याचप्रमाणे आगामी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर-२०२४ रोजी निवडणूक चिन्ह-घड्याळ यासमोरील क्रमांक-४ चे बटन दाबून आपण सर्वांनी मला लोकसेवेची संधी द्यावी,असे  विनंतीपूर्ण आवाहनही या आशिर्वाद पदयात्रेत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी जनसामान्यांना करून आपल्या सर्वांची साथ,विश्वास व मतदानरूपी आशिर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिल,अशी अपेक्षापूर्ण विश्वास त्यांनी यावेळी आनंद कॉलोनी-भाऊ कॉलोनी येथे स्थानिकांच्या समक्ष व्यक्त केला.शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम करीत पर्यावरणीय स्थिरता साधत या धोरणांच्या अंमलबजावणीत सातत्य राखीत स्थानिक समस्यांच्या अनुषंगाने दीर्घकालीन नियोजन करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.स्थानिक स्वराज्य संस्था, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना शासनाच्या योजना स्थानिक स्तरावर अंमलात आणणे,तसेच नागरिकांच्या गरजांनुसार शासनाला सूचना देणे,शासनाच्या विविध योजना, निधी आणि अनुदानांचा योग्य वापर करून लोकहीतकारक प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.असा विश्वास यावेळी व्यक्त करीत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी पलाश लाईन-संतोष भुवन लाईन-पूनम फोटोज स्टुडिओ लाईन-सत्यदेव फर्निचर लाईन परिसर येथे जनसंपर्क-संवादादरम्यान जनसामान्यांचे आशिर्वाद घेतले.या आशीर्वाद पदयात्रेत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांचे जागोजागी महिला भगिनींनी औक्षण-कुमकुंम तिलक करीत स्वागत केले. सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणींची जाण असलेले नेतृत्व, जनतेच्या मनातील सेवक ,अमरावती मतदारसंघात विकासाच्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या अशी ओळख असलेल्या महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई यांनी या आशीर्वाद पदयात्रेत वाटचाल करताना जनसामान्यांच्या समस्या जाणून घेत,आगामी काळात संबंधित समस्यांचे निराकरण करण्याला आपली प्राथमिकता राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विकलांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या संधी तसेच त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर आहे.श्री संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश  लक्षात घेऊन सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यापासून प्रेरित होऊन मानव कल्याणासाठी अविरतपणे प्रयत्नरत असलेल्या सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशिर्वाद पदयात्रेत सर्वधर्मसमभाव चा अभिनव संदेश देत सहभागी झालेल्या सर्व समाज घटकांनी यावेळी नामदेव महाराज गल्ली-ठाकरे मेडिकल लाईन-संजीवनी कॉलोनी येथे स्थानिक नागरिकांना सुलभाताई खोडकेंनाच मतदान करण्याचे आवाहन केले असता,यावेळी स्थानिकांनी विकासकामांचे नियोजन व वेळेचे व्यवस्थापन करणाऱ्या सुलभाताईंकडे जनतेचा कल राहील.असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी दिसून आला असल्याचे दृश्य यादरम्यान दिसून आले.या आशिर्वाद पदयात्रेत सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताचा स्वीकार करीत संतभूमीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्याकरिता मी आलेली आहे , या शब्दात कृतज्ञता व्यक्त करीत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी सामाजिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि उपयोगिता सेवा पुरवता येण्यासह लघु,सूक्ष्म आणि पारंपरिक उद्योगांचे सरंक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी एकता महिला मंडळ परिसरात नागरिकांशी हितगुज करतांना सांगितले.या आशीर्वाद पदयात्रेत गाडगे नगर परिसर स्थित राधा नगर,सदिच्छा कॉलोनी,विनायक नगर,नारायण नगर,आनंद कॉलोनी,प्रेरणा कॉलोनी,पुंडलिकबाबा मंदिर परिसर,भाऊ कॉलोनी,खोडके लाईन,पलाश लाईन,संतोष भुवन लाईन,पूनम फोटो स्टुडिओ लाईन,सत्यदेव फर्निचर लाईन,नामदेव महाराज मंदिर गल्ली,ठाकरे मेडिकल लाईन,संजीवनी कॉलोनी,एकता महिला मंडळ लाईन परिसर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!