अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये महायुतीच्या उमेदवार- सुलभा खोडके यांची अभूतपूर्व पदयात्रा
कोरोना काळामध्ये लॉक-डाऊन असतांना सर्व क्षेत्रातील आर्थिक स्थिती विस्कळीत झाली होती. हातावर पोट असणाऱ्या श्रमजीवी वर्गाचे हाल झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशा बिकट परिस्थितीत व्यापार पूर्वपदावर आणून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण शासन-प्रशासन व व्यापारी आस्थापनांशी सुसंवाद घडवून आणला. यातूनच कोरोना काळातही अन्न-धान्य , पालेभाज्या , फळे व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नरत राहून श्रमिक,कष्टकरी वर्गाचे कल्याण व व्यापारी हीत जोपासले आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी,अडते, व्यापारी, हमाल व मापारी बांधवांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मार्केट परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी काळात यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी व्यापारी बांधव व श्रमजीवी वर्गाची साथ ही निवडणुकीमध्ये मोलाची ठरणार असल्याची भावना महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी निवडणूक प्रचारार्थ जनाशीर्वाद यात्रा करून शेतकरी,अडते, व्यापारी, हमाल व व्यापारी बांधवांशी संवाद साधला तसेच येत्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला आपण सर्वांनी आपले मतदानरुपी आशीर्वाद प्रदान करण्याचे विनंतीपूर्ण आवाहन केले. यावेळी सुलभाताईंनी स्थानिक बांधवांशी संवाद साधतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट )व मित्र पक्ष म्हणून आपण महायुतीकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहोत. महायुती सरकारने गेल्या अडिच वर्षाच्या काळात शेतकरी,अडते, व्यापारी, हमाल व व्यापारी बांधवांचे हित जोपासून जे काही निर्णय घेतले , त्या निर्णयांची अमरावतीमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. मार्केट यार्ड मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांच्या धान्यमालासाठी टिनाचे शेड, लिलाव ओटा, उपहार गृह, शिवभोजन केंद्र, विसावा केंद्र आदींसह पिण्याचे पाणी, रस्त्याचे काँक्रीटीकरण, स्वच्छता, अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. आगामी काळातही विकासाचे चक्र असेच अबाधित राखण्याकरिता पुन्हा मला काम करण्याची संधी द्यावी , असे आवाहन विद्यमान आमदार तथा महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांनी केले.
गत पाच वर्षाच्या काळामध्ये आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी,अडते, व्यापारी, हमाल व व्यापारी बांधवांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करून या घटकांचा आवाज बुलंद केला. कोरोना काळात अमरावती मधील जवळपास ५० हजार श्रमजीवी वर्गावर उपासमारीची वेळ आली असतांना लॉकडाऊन च्या नियमात शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला. हे आमच्या लक्षात असल्याने आम्ही यंदाच्या निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचा निर्धार बाजार समिती मधील शेतकरी,अडते, व्यापारी, हमाल व व्यापारी बांधवांनी व्यक्त केला. यावेळी मार्केट यार्ड परिसरात प्रचार पत्रकांचे वाटप करून सुलभाताईंनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा तसेच आगामी विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडण्यात आले. यावेळी महायुती-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाची टिक-टिक सर्वदूर पणे वाजत असल्याचे चित्र उमटले होते.