LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

अमरावतीचे विकासचक्र गतिमान करण्यासाठी सर्व समावेशक जनतेची साथ मोलाची- आ.सौ. सुलभाताई खोडके

संतोषी नगर-शिव नगर-जय सियाराम नगर जनआशीर्वाद यात्रेला महिला, युवक व जेष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद
महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने संचारला जोश व उत्साह
 
अमरावती दिनांक-१४ नोव्हेंबर :- 
 विकासाच्या संकल्पनेत मुलभूत विकास म्हणजेच नागरी भागात सुसज्ज रस्ते, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य  सुविधा , शैक्षणिक कार्य  तसेच सौंदर्यीकरण व सुशोभीकरण, खुल्या मैदानांना चेन्लिंग -फेन्सिंग व क्रीडांगण विकासातून शाश्वत विकासाला बळकटी देणे महत्वाचे आहे. तर मानव विकास साधण्यासाठी सर्व समाज बांधव व सर्वसमावेशक जनतेचे जिव्हाळ्याचे व न्याय हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका घेणे, त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी मुलभूत विकास व मानव विकासाची सांगड असते,त्याच ठिकाणी विकासाचे पर्व नांदत असते. मागील पाच वर्षांपासून अमरावतीकर जनता विकासाचे पर्व अनुभवत आहे. हीच विकासाची शृंखला अबाधित राखून विकासचक्र अधिक गतिमान करण्यासाठी आपण पुन्हा अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उभे ठाकले आहे. यामध्ये जनतेच्या अपेक्षेनुरूप विकास कामे करण्यास आपले प्राधान्य असल्याने त्यांच्या समस्या , अडीअडचणी व विविध प्रश्न जाणून घेण्याकरिता जनाशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संवाद सुरु आहे. येत्या निवडणुकीत जनतेने भरघोस मतांनी निवडून देऊन जनसेवा करण्याची संधी दयावी , अशी मार्मिक हाक महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी मतदार बांधवांना लगावली आहे.  
स्थानिक संतोषी नगर, शिव नगर, बजरंग नगर , जय सियाराम नगर आदी भागात महायुतीच्या उमेदवार- सौ. सुलभाताई खोडके यांनी भव्य  पदयात्रा करीत स्थानिकांशी संवाद साधला. सौ. सुलभाताई खोडके यांच्या आमदारकीच्या काळात शहरातील विविध ठिकाणच्या परिसराच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाल्याने परिसरात अंतर्गत रस्त्यानी कात टाकली असून खुल्या मैदानांना चैनलिंग फेन्सिंग व सौंदर्यीकरण करण्यात आल्याने स्थानिकांना चांगली सुविधा मिळाली आहे. या बद्दल स्थानिक परिसरवासीयांनी त्यांचे स्वागत व सत्कार करीत अभिनंदन देखील केले. कुठलेही कार्य करतांना व निर्णय घेतांना आपल्या माणसांना विश्वासात घेणे महत्वाचे आहे आपल्या माणसांची साथ व सहकार्य असेल तर काम करण्याचे धाडस व ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण केलेल्या विकास कार्य व जनतेच्या विश्वासाच्या जोरावर  अमरावती विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून सर्व स्तरारातून मिळता प्रतिसाद व आशीर्वाद हीच आपली काम करण्याची ऊर्जा आहे.  पुढेही जनतेने पाठीशी राहून हाच विश्वास कायम ठेवून  या निवडणुकीत घड्याळ या चिन्ह समोरील क्रमांक-४ चे बटन दाबून मला  विजयी करण्याचे आवाहन  महयुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये चांगलाच जोश व उत्साह संचारला होता.  ढोल ताश्याच्या गजरात, फटाक्याच्या अतिषबाजीमध्ये तसेच कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण घोषणाबाजीत निघालेली सुलभाताईंच्या पदयात्रेमध्ये  महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने शिवशक्ती-भीमशक्ती-कमळ शक्तीच्या एकतेचे दर्शन घडवून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!