कृष्णा नगर-नानक नगर-रामपुरी कॅम्प येथे आशीर्वाद पदयात्रेत महायुतीच्या उमेदवार-सौ. सुलभाताई खोडके यांचा नागरिकांसोबत जनसंवाद ते मनसंवाद
विकासात्मक ध्येय धोरणांचा प्रयास यावर सातत्यपूर्ण भर-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके
कृष्णा नगर-नानक नगर-रामपुरी कॅम्प येथे आशीर्वाद पदयात्रेत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांचा नागरिकांसोबत जनसंवाद ते मनसंवाद
सहकार नगर-माधव नगर येथे आबालवृद्धांसह नवमतदारांशी संवाद साधत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी आपले कर्तव्य समजून नागरिकांनी मतदान करण्याचे केले विनंतीपूर्ण आवाहन
आगामी पाच वर्षांत राबविण्यात येणाऱ्या आराखड्याचे प्रतिबिंब लक्षात घेता, नागरिकांची महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंनाच सामर्थ्यपूर्ण साथ देण्याची ग्वाही
अमरावती -होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक यांनी अमरावती शहराच्या उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा जोपासली आहे.शहर उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार म्हणून आज उद्योग-व्यवसायातील कार्यरत घटक ओळखले जातात.अमरावती शहरात उद्योगानुकूल वातावरण तयार करणे यावर आपला भर आहे.असे प्रतिपादन करीत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी कृष्णा नगर-रामपुरी कॅम्प-नानक नगर येथील स्थानिकांशी संवाद साधला.सामाजिक मानके,मूल्ये,नीतीतत्वे व प्रमाणके यांची जोपासना हा घटक संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही बाजूंनी महत्वाचा आहे. मानवी हक्क व मानव संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून मानवी हक्क आणि मानवी संसाधनांच्या विकासावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.अशा शब्दांत सहकार नगर-माधव नगर येथील नागरिकांशी हितगुज करीत डोअर-टू-डोअर प्रचार करताना महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी मतदात्यांना आपली वचनबद्धता व कटिबद्धता व्यक्त केली.संघटनकौशल्य,एकाचवेळी अनेक प्रकारच्या जवाबदारी पार पार पाडण्याचे कौशल्य,कामाचे आणि वेळेचे नियोजन,अमरावती शहराला औद्योगिक आघाडीवर अग्रेसर करण्यासाठी सातत्यपूर्ण तळमळ,’ सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी ‘ जाहीरनामा ,महत्वाकांक्षी उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर भर,आव्हानात्मक धोरणांची अंमलबजावणी, नियमित अपडेटस,शिस्तबद्धता व संयमाने वाटचाल आदींसह विविध बाबींमुळे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांची आशीर्वाद पदयात्रा ही जनसामान्यांच्या सर्वांगिण विकासाला गती व बळ देण्यासाठी असल्याची प्रचिती येत असल्याने या आशिर्वाद पदयात्रेत वाढता वाढता वाढे…..नुसार दररोजच्या दररोज लोकसंग्रहात-जनसंपर्कात पण वाढ होत आहे. जनतेसमोर आपली भूमिका समजावून सांगतांना तसेच आगामी पाच वर्षात राबविण्यात येणाऱ्या आराखड्याचे प्रतिबिंब मांडतांना महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांचे लोकसेवेचे अविरतपणे कार्य आणि आब न सोडणारी नम्रता यामुळे त्यांना जनसामान्यांकडून एकप्रकारची विश्वासार्हता आणि आदरयुक्त स्वीकारार्हता लाभत असल्याचे दृश्य या आशीर्वाद पदयात्रेत दिसून येत आहे. प्रत्येक घरोघरी वाढता जनसंपर्क तसेच शहरी जनसामान्यांशी असलेले त्यांचे अनुबंध हे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांचे सामर्थ्यस्थळ आहे.प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मतदान करावे,असे विनंतीपूर्ण आवाहनही करीत आगामी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला बहुससंख्येने मतदान करीत जनसेवेची संधी द्यावी,अशी विनंती करीत नागरिकांसोबत सौ.सुलभाताई खोडके यांचा दैनंदिन आशीर्वाद पदयात्रेत जनसंवाद ते मनसंवाद सुरू आहे.महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशिर्वाद पदयात्रेत विद्यार्थी, शिक्षक,औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक-कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांपासून ते वैद्यकीय, इंजिनिअरिंग,मानसशास्त्र असे विविध विद्यार्थी, व्यापार जगत,आयटी,लॉजिस्टिक्स अशा अनेक प्रकारच्या विविध घटकांशी जनसंवाद साधित नवीन समस्या,नवी माहिती,नवे प्रश्न,नव्या दिशा,नवी उकल यासोबतच अनेक वयोगट,समाजगट,व्यावसायिक,विविध भाषाधर्माची मंडळी ह्यांचा वाढता सहभाग यामुळे अनोखा ‘ ब्लेन्ड ‘ जनसंवाद ते मनसंवादातून अनुभवयास मिळत आहे.या आशिर्वाद पदयात्रेत कृष्णा नगर,नानक नगर,रामपुरी कॅम्प,सहकार नगर,माधव नगर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.