गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट
अमरावती, दि. 14 : जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या गृहमतदानाला सुरूवात झाली. दर्यापूर मतदारसंघातील गृहमतदानादरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. तसेच गृहमतदान सुरू असलेल्या जयबुनाबी मोहम्मद अली, रा. दर्यापूर यांच्या घरी भेट दिली. गृहमतदानाच्या प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेले स्वीप मल्टीमिडीया वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदान यंत्र असलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्र आहेत. शहरातील वा. का. धर्माधिकारी नगर परिषद शाळा क्र. 12 येथील पिंक बुथ, जु. मो. लड्डा नगर परिषद शाळा क्र. 7 येथील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे बुथ आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व मतदान केंद्रावर पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
तसेच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या निवडणूक विषयक कामकाज सुरु असेलेले पोस्टल बॅलेट विभाग, मतदारयादी कक्ष, निवडणूक साहित्य कक्ष, आचारसंहिता कक्षाला भेट देवून पाहणी केली. तसेच कामकाजाबाबत सूचना दिल्या.