शोभानगर येथील पदयात्रेत “वारे घड्याळ..आली रे घड्याळ “चा बोलबाला
महायुतीच्या उमेदवार आ.सौ.सुलभाताई खोडके यांची जनआशीर्वाद यात्रा…
मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे आवाहन…
अमरावती १४ नोव्हेंबर :- समाजामध्ये नवा बदल घडवायचा असेल तर पायाभूत सुविधांच्या पूर्ततेतून नागरीकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. यासाठी तात्पुरत्या सुधारणा करून चालणार नाही, तर दीर्घकालीन उपाययोजना करून शाश्वत विकासाला बळकटी देणे महत्वाचे आहे. यासाठीच जनतेच्या अपेक्षेनुरूप विकासकामे करण्यावर आपला भर राहिला असून पुढेही अमरावतीमध्ये विकासाचे पर्व नांदत राहो, यासाठी आपण कटीबद्ध असल्याचा विश्वास महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या शोभानगर भागातील जनआशीर्वाद पदयात्रेतून व्यक्त केला.
अमरावती शहर हे एक पुरातन नगरी म्ह्णून ओळखल्या जात असून संत व थोर महापुरुषांचा सुद्धा गौरवशाली इतिहास लाभला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने याठिकाणी भौतिक सुविधा व संसाधने उपलब्ध आहेत.परंतु अमरावतीकर नागरिकांच्या शैक्षणीक, सामाजिक, आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करून आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने आज रस्ते , पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा , क्रीडा विकास , महावितरण सेवांची कामे, पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना विकासाची अनुभूती आली असल्याने त्यांनी महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनाच आपली सर्वोतोपरी साथ दर्शविली आहे. याची प्रचिती ही शोभानगर भागातील जनआशीर्वाद यात्रेतून दिसून आली. दरम्यान सुलभाताईंनी जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीकरिता आशीर्वाद घेतले. आपल्या पदयात्रेच्या माध्यमातून सुलभाताई घरोघरी जात असल्याचे कळताच स्थानिक भागातील नागरिक त्यांच्या स्वागतासाठी तयार होते. तर महिलांनी सुलभाताईंचे औक्षण करून व जेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला. अमरावती शहराचा गतिमान विकास करण्याचा आपला मानस आहे. यासाठी विकासाचे व्हिजन घेऊन आपण या निवडणुकीत उभे ठाकलो आहे. महिला सुरक्षेला आपले प्राधान्य असून शहर सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व प्रकारच्या योजनांची माहिती व सुविधा एकाच दालनात उपलब्ध व्हावी म्हणून हेल्पलाईन सुविधा केंद्र, क्रीडा सुविधांचा विस्तार, महावितरण व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी तीन नवीन ३३ केव्ही उपकेंद्र, उद्योगांकरिता नदी जोड प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकरिता अभ्यासिका केंद्र, आदी बाबींची उपलब्धता नजीकच्या काळात करण्यात येईल. या सर्व बाबी आपल्या जाहीरनाम्यातून जनतेसमोर मांडण्यात आल्या आहेत. यावर शिक्का मोर्तब करण्यासाठी सर्व जनतेने येत्या २० नोव्हेंबर रोजी घड्याळ च्या चिन्हासमोरील बटन क्रमांक ४ दाबून विजयी करण्याचे आवाहन महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व सहकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते.