प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समता मिळवून देण्याचे उद्दिष्ट- महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके
शहराच्या विकासासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात सुधारणा करणे हेच आपले ध्येय-आमदार सौ.सुलभाताई खोडके..
रुख्मिनी नगर-विजय कॉलोनी येथे आशिर्वाद पदयात्रेत महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांचा अमरावती शहराचा समतोल विकास साधण्याचा संकल्प..
श्याम नगर-नारायण नगर-वनराई परिसरात महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंनी आज मी जे काही आहे,त्याचे संपूर्ण श्रेय हे आपणा सर्वांचेच असल्याचे दिली ग्वाही..
अमरावती विधानसभा निवडणूक २०२४ रुख्मिनी नगर परिसरात सर्वत्र घड्याळाचीच टिकटिक असल्याची प्रचिती..
अमरावती १५ नोव्हेंबर :- मतदान प्रक्रिया लोकशाही व्यवस्थेची आधारशीला आहे.आपल्या समाज,देशाला योग्य आकार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. एकूणएक मतदार आणि त्यांच्या मताला लोकशाहीमध्ये प्रचंड महत्व आहे. आजवरचा इतिहास बघता प्रत्येक सरकार स्थापण्यात प्रत्येक मताने अतुलनीय योगदान दिले आहे. असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी आशिर्वाद पदयात्रेत रुख्मिनी नगर-विजय कॉलोनी येथे उपस्थितांना संबोधून केले.अमरावती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे.प्रत्येकाचे समाधान होईपर्यंत शासन,प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.मतदारसंघात सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहीजे,तसेच अधिकाधिक निधी उपलब्ध करून देत विकासपर्व यापुढेही अखंडित सुरू ठेवण्याचा आपला संकल्प आहे.वैचारिक बांधिलकी, नीतिमत्ता, सदैव सोबत असणाऱ्या मतदार बांधव व भगिनींचा विश्वास सार्थ ठरवीत महायुतीचे उद्दिष्ट हे प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समता मिळवून देण्याचे आहे.या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राजेंद्र कॉलोनी-श्याम नगर येथे आशिर्वाद पदयात्रे दरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.लोकशाही व्यवस्थेत मतदान हे महत्वपूर्ण कर्तव्य आहे. आपल्या समुदायाचे भविष्य निश्चित करण्याचे सामर्थ्य मतदानामध्ये आहे.प्रत्येक कुटुंबातील प्रमुखाने,परिवारातील सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याची पुष्टी करायला हवी.रोजगार निर्मितीसाठी विकास प्रकल्प,गुंतवणूक, रस्तेविकासावर निधी खर्च केला तर दिर्घकाळासाठी मदत तर होणारच आहे, अमरावती शहराची अर्थव्यवस्था भरभराटीला येईल.अशी भूमिका स्पष्ट करून आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी येत्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी घड्याळ या चिन्हासमोरील क्रमांक-४ चे बटन दाबून मला मतदान करीत लोकसेवेची संधी द्यावी.वनराई परिसर व नारायण नगर समस्त नागरिकांना यावेळी विनंतीपूर्ण आवाहन केले.सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा, शिक्षण,पायाभूत सुविधा, संशोधन आणि विकास इत्यादींसह इतर महत्वांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर आहे.टीका ही लोकशाहीची जीवनरेषा आहे.या बाबीकडे लक्ष वेधून आपल्या विधायक व विकासात्मक कार्याच्या पुर्ततेतून व त्याला संयमाने कृतीची जोड देऊन आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी जनता,शासन व प्रशासनाशी समनवय साधित आज अमरावती शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणीत विकासकांमाना गती प्राप्त करून देत जणूकाही सुवर्णमध्य साधला आहे.याचीच प्रचिती म्हणजे आता महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडकेंच्या आशीर्वाद पदयात्रेत सर्वसामान्य माणसासह आज वास्तू विशारद,डॉक्टर्स,इंजिनिअर्स, सनदी लेखापाल,पर्यावरण-निसर्ग प्रेमी,उद्योजक, गृहिणी,विकसक,वकील,कास्तकार, आदींसह विविध प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.महायुतीच्या सरकारने विविध कल्याणकारी योजनांद्वारे गरीब,शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी मह्त्वाची पावले उचलली आहेत. सरकारचे ध्येय केवळ आर्थिक विकास नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे.असा संदेश देणाऱ्या आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशिर्वाद पदयात्रेत यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक-युवतीद्वारे ‘मोठया संख्येने सहभागी होत ‘घड्याळ तेच वेळ नवी ‘ या अभिनव संदेशाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करीत लक्षवेधी प्रतिसाद दिला जात आहे.आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशीर्वाद पदायात्रेच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांचे वतीने त्यांचे जागोजागी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे.या स्वागताचा स्वीकार करीत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करीत जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आगामी बुधवार दिनांक-२० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला बहुससंख्येने मतदान करीत पुनश्च जनसेवेची संधी द्यावी,अशी स्थानिकांना विनंती केली. त्यांच्या या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद देत यावेळी सर्वस्तरीय नागरिकांनी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.आशिर्वाद पदयात्रेत नारायण नगर-रुख्मिनी नगर-विजय कॉलोनी-राजेंद्र कॉलोनी-श्याम नगर-वनराई परिसर-नारायण नगर बगीचा परिसर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधव तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.