LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

अंबागेट – जुन्या अमरावतीच्या अभुतपूर्व विजय संकल्प महापदयात्रेने डॉ.सुनील देशमुख यांच्या विजयाचा शंखनाद 

माजी महापौर विलास इंगोले यांचा नेतृत्वात प्रचंड जनसमुदायाच्या समवेत भरला विजयी हुंकार 

येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक  निवडणूकी मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघात अंबा गेट परकोट च्या आतील डॉ.सुनील देशमुख यांच्या समर्थनार्थ अभूतपूर्व अशा भव्य महापदयात्रेने डॉ.सुनील देशमुख यांच्या विजयाचा जणू शंखनादच केला असल्याचे चित्र संपूर्ण जुन्या अमरावतीमध्ये अनुभवायला आले.माजी महापौर विलास इंगोले, यांच्या पुढाकाराने या महापदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला शक्तीने ज्येष्ठ नागरिक युवक यांनी सहभागी होऊन  हे स्थापित करून दिले की ते डॉ. सुनील देशमुख यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहे याची प्रचिती या महापदयात्रेने करून दिली. या पदयात्रेचे नेतृत्व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख शीवसेना नेते माजी खासदार अनंतरावजी गढे,प्रदीप वडनेरे, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास  इंगोले मिलिंद चीमोटे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यासह महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते यांनी पदयात्रेचे नेतृत्व करीत डॉ. सुनील देशमुख यांच्या समवेत नागरिकांचे आशीर्वाद प्राप्त केले

खऱ्या अर्थाने जुनी अमरावती हे शहराचे वैभवच आहे. आणि आजवरच्या निवडणुकांमध्ये आलेल्या अनुभवातून गेटच्या आत मधून निवडणुकांचा कल खऱ्या अर्थाने बनायला सुरुवात होतो आणि हीच हवा पुढे सबंध शहर पर जाऊन याचे रूपांतर विजयी उमेदवाराच्या मताधिक्यात होत असते. याचा. प्रत्यय काल डॉ.सुनील देशमुख यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरलेल्या जनसमुदायाने आणून दिला. या महापूर यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे जुन्या अमरावतीतील नागरिकांनी सहभागी होऊन डॉ.सुनील देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपाने  समर्थन असल्याचे आपल्या कृतीतून सिद्ध केले. 

जुन्या अमरावतीतील नागरिकांनी डॉ.सुनील देशमुख यांना आजवर ते लढलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांची साथ केलेली आहे. त्यांचे कार्यकाळात अमरावती शहराचा शिस्तबद्ध आणि सर्व क्षेत्रात केलेल्या विकास ही त्यांना मिळणाऱ्या जन समर्थनातून सिद्ध होत आहे. अत्यंत सचोटीने नागरिकांच्या हिताची कामे करणे कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी कधीही त्यांचे नावाचा उल्लेख न होणे हेच प्रामाणिकता त्यांच्या राजकारणाचे खरे सूत्र असल्याने चौफेर मोठे जनसमर्थ्य जनतेचे त्यांना मिळत आहे. ही निवडणूक जिंकणे हे खऱ्या अर्थाने आता औपचारिकता बाकी असल्याचे या जनसमर्थनातून स्थापित होत आहे. ही भव्य पदयात्रा आंबा गेट गांधी चौक इथून सुरू होऊन ती आजार हिंद मंडळ बुधवार चौक, निळकंठ चौक, येथे मार्गस्थ होत खोलापुरी गेट मार्गे भाजीबाजार  सराफा, महाराणा प्रताप चौक, जवाहर गेट हा संपूर्ण परिसर मार्गक्रमण करीत जवाहर गेट येथे समारोप करण्यात आला.

या अभूतपूर्व महापरयात्रेने डॉक्टर सुनील देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तबच केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!