कामगारांचे जीवनमान सुधारणे,त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्नरत-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके
लोकसहभाग,नियोजन लोकाभिमुख, सुलभ निर्णय प्रक्रिया या त्रिसूत्रीचा अवलंब करून महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंनी दिली मतदारांना भावनिक साद..
राहुल नगर-बिच्छु टेकडी येथे आशीर्वाद पदयात्रेचे स्वागत करीत नागरिकांचा महायुतीच्या उमेदवार- सौ.सुलभाताई खोडके यांना सर्वशक्तीनिशी प्रतिसाद…
वडाळी-देवी नगर-प्रबुद्ध नगर-सुदर्शन नगर येथे गृहभेटीतून महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंनी मतदानाचा हक्क बजाविण्याचे केले नागरिकांना आवाहन..
लोकशाही मूल्यांशी बांधिलकी दर्शवित आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशीर्वाद पदयात्रेचे शहरात जागोजागी भव्य स्वागत…
अमरावती दिनांक-१५ नोव्हेंबर- कोणत्याही व्यवसायात,व्यापारात खाजगी आस्थापनेतील दुकाने,इतर आस्थापना,निवासी हॉटेल,खाद्यगृहे,अन्य गृहे,नाट्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर,कारखाने,चित्रपटगृहे,मॉल्स व रिटेलर्स आदी आस्थापनेतील कामगारांना तसेच जवळच्या औद्योगिक क्षेत्रात वसाहती असलेल्या कामगारांचे जीवनमान सुधारणे.यासोबतच कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास झाला पाहिजे,याकरिता आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.याकरिताच केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे.यासाठी आपण वचनबद्ध आहोत. असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राहुल नगर-बिच्छु टेकडी येथे आशीर्वाद पदयात्रेत उपस्थितांना संबोधून केले.२०१९ ते २०२४ दरम्यान पाच वर्षे आमदार म्हणून काम केल्यावर जनतेला आलेल्या सकारात्मक-सहकार्यरुपी अनुभवातून आज आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांना या निवडणुकीत प्रचारासोबतच विविध संघटनेचे मिळणारे समर्थन तेव्हढेच महत्त्वाचे ठरत आहे. शासन,प्रशासन,कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांशी जुळवून ठेवलेली नाळ आज त्यांना अमरावती विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात पाठराखण करणारी ठरत आहे. सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा,पायाभूत सुविधांचा विस्तार यासोबतच लोकसहभाग जेव्हढा अधिक,तेव्हढे नियोजित लोकाभिमुख असेल या त्यांच्या कार्यप्रणालीमुळे शहराचा विकास असो की सामाजिक न्याय याकरीता शहरातील सर्व घटकांचा समावेश-सहभाग निश्चित करणे हे कसब महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांना चांगले अवगत असल्याने दररोजच्या आशीर्वाद पदयात्रेत वाढता सहभाग हे जनतेच्या वाढत्या भरभक्कम समर्थनातून जणूकाही त्यांच्या विजयाच्या सिद्धीचे संकेत आहे,अशी चर्चा सध्या जनमानसात ऐकिवात आहे.महिलांच्या किंवा दुर्बल वर्गाच्या हितासाठी करावयाचा एखाद्या कृती कार्यक्रम योजना किंवा उपयुक्तता यांच्या प्रयोजनासाठी आपले सदैव तत्पर-सहकार्य राहील.या शब्दांत गजानन नगर-अंध विद्यालय परिसर समिपच्या स्थानिकांशी महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी संवाद साधला.आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी विधायक कामांची कशी भक्कम पायाभरणी करावी लागते,याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून २०१९ ते २०२४ करिता आपण सर्वांनी सर्वशक्तीनिशी साथ देत लोकसेवेची संधी दिली,तीच मतदानाची आशीर्वादरुपी साथ देऊन मला पुनश्च जनसेवेची संधी द्यावी,अशी भावनिक साद वडाळी-देवी नगर-परिवारपुरा-प्रबुद्ध नगर येथील नागरिकांना साद घातली असता नागरिकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडकेंच्या आशीर्वाद पदयात्रेत वाढता लोकसहभागातून एक नवे चैतन्य निर्माण झाले असल्याने आता घड्याळाचे काटे वेगानं फिरणार असल्याचे चित्र यावेळी गवळीपूरा-मातंगपुरा-शीखपुरा-सुदर्शन नगर-तलावपुरा परिसरात दिसून येत आहे. या आशीर्वाद पदयात्रेत राहुल नगर-बिच्छु टेकडी-गजानन नगर-अंध विद्यालय-वडाळी परिसर-देवी नगर-परिवारपुरा-प्रबुद्ध नगर-गवळीपुरा-मातंगपुरा-शिखपूरा-सुदर्शन नगर-वडाळी तलाव परिसर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.