तिवसा तालुक्यामध्ये भाजपला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिवसा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या घटनेमुळे भाजपमध्ये खिंडार पडले असून गटबाजी आणि मानसन्मानाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसेल अशी चर्चा रंगू लागली आहे.
तिवसा तालुक्यातील शेकडो भाजपच्या निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश झाला आहे. भाजपची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल असा पक्ष झाल्याची खंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यशोमती ताईंच्या कामांवर आणि नेतृत्वांवर विश्वास ठेवून या युवकांनी भाजपला तिवसा तालुक्यात खिंडार पाडले आहे. भाजपच्या या शिलेदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने व यशोमती ताई ठाकूर यांना पाठिंबा दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. यावेळी यशवर्धन ठाकूर, वैभव वानखडे तिवसा तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष, योगेश जी वानखडे गजानन काळे रूपालीताई काळे विश्वजीत बाखडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रामुख्याने योगेश बंड भाजपा युवा मोर्चा अमरावती जिल्हा,
आशिष कोंडे, सचिन राऊत, मयूर पन्नासे, पंकज कोंडे, प्रशांत तुप्पट, सुरज कोंडे, अक्षय बाळस्कर, ज्ञानेश्वर काळे, भूषण भोयर, रोशन भोयर, रोशन पाटीलपैक, शुभम बाळास्कर, आर्यन भोकासे, नमन भोकसे, प्रशांत बंड, यश बंड, आकाश पुंड, कुणाल कोंडे ,
प्रविण भोयर, यांच्यासहअसंख्य युवकांनी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.