संदर्भ सेवा रुग्णालयात रेडिओथेरपी सुविधा उपलब्धीमुळे कर्करुग्णांना दिलासा-आमदार सौ.सुलभाताई खोडके
दूरदर्शीता आणि नेतृत्वकौशल्यामुळे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशीर्वाद पदयात्रेला नागरिकांचे वाढते समर्थन
आरोग्यसेवेची बांधिलकी स्वीकारीत रुग्ण-हक्कांचे संवर्धन धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध-महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके
हमालपुरा-गांधी नगर जनसामान्यांसाठी समग्र व पारदर्शक धोरण राबविण्याची महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांची ग्वाही
रेल्वे स्टेशन चौक ते बेलपुरा मार्ग परिसर स्थित न्यू हायस्कूल शाळा परिसर समीप घड्याळाचा वाढता प्रभाव
अमरावती १६ नोव्हेंबर – शासकीय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ) येथे कर्करोग रुग्णांसाठी नव्याने रेडिओथेरपी,डे केअर युनिट किमोथेरपी चे युनिट सुरू केले जाणार असल्याने या आरोग्य सेवा-सुविधेचा कर्क रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लाभ होणार आहे. याकरिता आपण यापूर्वी शासनाच्या आरोग्य विभाग व स्थानिक आरोग्य यंत्रणा सोबत संपर्क साधून तसेच बैठक घेत यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या होत्या. तसेच शासन दरबारी,विधिमंडळ अधिवेशनात डे-केअर युनिट किमोथेरपीची सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुद्दा उपस्थित केला होता.यापूर्वी संदर्भ सेवा रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने कर्करोग रुग्णांना खासगी किंवा अन्य ठिकाणी जावे लागत होते.ही बाब लक्षात घेता आपण शासनाचे लक्ष वेधून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात रेडिओथेरपी आणि डे-केअर किमोथेरपी आरोग्य सेवा सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्याचाच परिपाक म्हणून विशेष म्हणजे ही सुविधा शासकीय रुग्णालयात पश्चिम विदर्भात अमरावती येथे सुरू होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला,यवतमाळ, वाशीम,बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील रुग्णांना संबंधित सुविधेचा लाभ होत असल्याने दिलासा मिळाला आहे. अशी माहिती देत महायुतीच्या उमेदवार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या द्वारे आपल्या आशीर्वाद पदयात्रेत नागरिकांना ” आधी केले ,मग सांगितले ” नुसार विविध प्रकारच्या उपलब्धीची माहिती दिली जात आहे.या आशीर्वाद पदयात्रेच्या निमित्ताने हमालपुरा-गांधी नगर येथे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांचे स्थानिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला भगिनींनी कुमकुंम-तिलक करीत त्यांचे औक्षण केले.यादरम्यान आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रुग्ण-हक्कांच्या सनदेचे सर्व पातळीवर पालन करणे आणि रुग्ण-केंद्री व्यवहार, रुग्ण-हक्कांचे संवर्धन आदी बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.सुयोग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह वंचित-गरजू घटक,अल्पसंख्याक समुदाय,दिव्यांग यांच्या आरोग्य सेवेच्या गरजा लक्षात घेऊन व त्यांचा आत्मसन्मान राखून शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना चा लाभ झाला पाहिजे.याला आपली प्राथमिकता आहे.या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी अमरावती रेल्वे स्टेशन चौक समिपच्या नागरिकांशी संवाद साधला.नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्याचे उपाय,शेती व पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांची आघात सहन करून पुन्हा मूळ पदावर येण्याची लवचिकता वाढविणे आणि वातावरण बदलाशी सुसंगत अशा पायाभूत सुविधा विकसित करणे यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.सामाजिक सुरक्षिततेचे उपाय व हरित कौशल्यांच्या विकासासाठीच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.ऑफिस, इमारती,शॉपिंग मॉल,हॉटेल आणि निवासी अपार्टमेंट परिसरात आजघडीस भौतिक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.याकरिता आपण कटिबद्ध असल्याचे सांगित आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी -चिचफैल परिसरातील जनसामान्यांच्या सोबत हितगुज साधले.समाजातील प्रत्येक वर्गाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असून आपल्या शैक्षणिक व सामाजिक जवाबदारी ची नागरिकांच्या प्रति जाणीव दर्शवित आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे,या करिता त्यांनी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले.आजकाल लर्निंगपेक्षा लर्निंग-रीलर्निंग-आजीवन लर्निंग या त्रयीचे महत्व वाढले आहे. आजच्या-उद्याच्या उद्योगाला,करिअर क्षेत्राला हेच अपेक्षित आहे. आदी बाबी लक्षात घेता, नवीन पिढीला अध्ययन, करिअर करायचंय तर सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय,डिजिटल लायब्ररी,शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य समुपदेशन लाभावे,याकरिता उपाययोजना व अंमलबजावणी करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.अशी भूमिका स्पष्ट करून आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी बेलपुरा मार्ग परिसर स्थित न्यू हायस्कुल शालेय परिसराच्या समिपस्थ नवमतदारांशी संवाद साधला.अमरावती शहरातील जे दिव्यांग बांधव व भगिनी आहेत.त्यांच्या समस्या व गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक आथिर्क मदतीची निकड बघता राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे,याकरिता आपण कटिबद्ध आहोत.या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी नागरिकांशी संवाद साधला.या आशीर्वाद पदयात्रेत हमालपुरा-गांधी नगर-चिचफैल-न्यू हायस्कुल शालेय परिसर तसेच अमरावती रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.