LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

बांद्रा पुर्व विधानसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार  वरुण सरदेसाई यांच्या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 वरुण सरदेसाई यांना प्रचंड संख्येने निवडुन दया – हाजी इब्राहिम भाईजान
मुंबई – महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार वरुण सरदेसाई यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आव्हान बांद्रा येथील नवपाडा च्या सभेमध्ये नागरिकांना संबोधीत करतांनी मुंबई काँग्रेस कमिटी मॉयनारीटी विभागाचे लोकप्रिय अध्यक्ष मुस्लिम समाजाचे नेते हाजी इब्राहिम भाईजान यांनी  केले.
बांद्रा पुर्व विधानसभा  क्षेत्रामध्ये आवाज महाविकास आघाडीचाच असून गल्लोगल्ली, घरोघरी शिवसेना उमेदवार वरुण सरदेसाई  यांचे दणदणीत स्वागत होत आहे. कुठे हार तर कुठे शाल व पुष्पगुच्छ देवुन वरुण सरदेसाई यांचा सत्कार करण्यात येत आहे. तर  कुठे पुष्पवृष्टी करत त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवार दिनांक 15 नोव्हबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांचा सांताक्रुज मधील गोळीबार नाक्यावर पदयात्रेचे आगमण होतोच गोळीबार येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वरुण सरदेसाई यांचा जोरदार फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केले.  यावेळी मुस्लिम समाजाच्या लोकांनी वरुण सरदेसाई यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. गोलीबार मध्ये  जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.
यावेळी मुंबई काँग्रेस मॉयनॉरीटी चे महासचिव इर्शाद काजी, व त्यांचे सहकारी लोकांनी वरुण सरदेसाई यांच्या सत्कार केला.  तसेच स्टार किड्स नरसरी चे प्रेसिडेन्ट जावेद अन्सारी यांनी सुध्दा वरुण सरदेसाई यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.  तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मॉयनॉरीटी विभागाचे सचिव आणि मुंबई मॉययनॉरीटी विभागाचे महासचिव पत्रकार जफरसिद्दीकी यांनी वरुण सरदेसाई यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.  यावेळी मुस्लिम समाजाचे शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. नासिर खान, जावेद अन्सारी, अलताफ शेख,त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी जमिल कुरेशी,असे असंख्य कार्यकते व पदाधिकारी वर्गाची उपस्थिती आवार्जुन होती.

लोकांमध्ये मिसळणारा, त्यांच्या प्रत्येक समस्येत तत्परतेने उभा राहाणारा, त्यांच्या एका हाकेला धावून जाणारा महाविकास आघाडीचा उमेदवार अशी ओळख असलेल्या वरुण सरदेसाई यांना प्रत्येक चौकात, नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली, घरोघरी तरुणवर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. वरुण सरदेसाई यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे औक्षण करून, ओवाळून स्वागत करण्यात आले. प्रचाररॅलीदरम्यान त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेतले. प्रचारात
शिवसेने उध्दव ठाकरे गटाचे चे पदाधिकारी, कॉग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, जमिल कुरेशी, जफरसिद्दीकी, इरशाद काजी, नासिर खान, जावेद अन्सारी, अलताफ शेख, आसिफ पटेल, मुख्तार शेख,  प्रचंड संख्येने उपस्थित होते.
 महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
गोलीबार येथे प्रचार रॅली समाप्त करण्यात आली त्यानंतर बांद्रा नवपाडा येथे जाहिर सभा घेण्यात आली होती. सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई, मुंबई काँग्रेस कमिटी मॉयनॉरीटी विभागाचे लोकप्रिय अध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, माजी खासदार हुसन दलवाई, शिवसेनेचे माजी नगरसेवक हलीम खान, उत्तर मध्ये जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष  फहिम इब्राहिम शेख, कदीर भाई, मॉयनॉरीटी काँग्रेसचे बांद्रा विभागाचे इनचार्ज रफीक भाई ,
यांची मंचावर उपस्थिती आवार्जुन होती.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी मतदारसंघातील पुनर्विकासाचा प्रश्न, वाहतूककोंडी, प्रदूषण कमी करणे, वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्व येथील रेल्वे स्थानकांबाहेरील गर्दी नियंत्रित करणे, पदपथावरील अतिक्रमण हटवणे त्याचबरोबर रस्ते सुधारणा, नियमित पाणीपुरवठा आणि सुनियोजित कचरा व्यवस्थापन अशा नागरी सुविधा देण्याचे आश्वासन देत प्रचारात आघाडी घेतली आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!