अखिल भारत हिंदू महासभेचा महायुतीच्या उमेदवार आ.सौ. सुलभाताई खोडके यांना जाहीर पाठींबा
व्यापक दृष्टिकोन आणि कार्यतत्परता पाहून दिले समर्थन,प्रचारातही उतरणार
अमरावती १६ नोव्हेंबर :- अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.सौ. सुलभाताई खोडकेयांच्या उमेवारीचे अखिल भारत हिंदू महासभा ने स्वागत व समर्थन केले असून त्यांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे. महासभेचे प्रदेशाध्यक्ष हिंदुश्री नितीन व्यास यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र काढून अमरावती विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना पूर्णपणे साथ दर्शविली आहे. अखिल भारत हिंदू महासभा ही सकल हिंदू धर्मियांच्या न्याय-हिताच्या रक्षणासाठी अविरतपणे काम करत आलेली आहे. यामध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा निर्माण करणे हेच मुख्य उद्दिष्ट असून सर्वसमावेशक विकासाला वेळोवेळी हातभार लावण्यासाठी झटत आली आहे. पाठिंब्याच्या पत्रातून अधिकृत भूमिका मांडताना असे अधोरेखित करण्यात आले आहे की, अमरावतीच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी मागील पाच वर्षात पक्ष,जात,धर्म,पंथ, याला न जुमानता केवळ लोक प्रतिनिधी म्हणून सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अमरावतीच्या विकासाला नवी दिशा व बळकटी देण्याचे काम केले आहे. शहरातील विविध धार्मिक स्थळांचा विकास करून त्या ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. अनेक धार्मिक व सामाजिक आयोजनातही त्यांचा सहभाग राहिला असल्याने त्यांनी भक्ती व सेवाभाव अविरतपणे जोपासला आहे. त्यांचा विशाल दृष्टिकोन व कार्यकरण्याची तत्परता पाहून आगामी काळातही अशीच विकास कामे सुलभाताईंच्या हातून मार्गी लागणार आहे,अशी जाणीव बाळगून त्यांना पाठींबा दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष हिंदूश्री नितीन व्यास यांनी सांगितले आहे. तसेच या निवडणुकीत अखिल भारतीय हिंदू महासभा सुलभाताईंच्या पाठीशी उभी असून त्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार सुद्धा पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला.