LIVE STREAM

Uncategorized

सौ. सुलभाताई खोडके यांची मार्केट परिसरात जनआशीर्वाद पदयात्रा

 व्यापारी हित जोपासत मार्केट परिसरात दर्जेदार व गुणवत्तापूर्वक पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणासाठी कटीबद्ध- आ.सौ. सुलभाताई खोडके

शहरातील मार्केट परिसरातुन निघालेल्या पदयात्रेतून व्यापारी बांधवांशी साधला संवाद..
लघु-मध्यम व किरकोळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी योग्य धोरण ठरवू – आ.सौ. सुलभाताई खोडके..
लॉकडाऊन काळात सुलभाताईंच्या प्रयत्नाने व्यापार पूर्वपदावर आल्याने मिळाली अर्थचक्राला गती- व्यापाऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता 
अमरावती १६ ऑक्टोबर :- 
 कोरोना काळात जेव्हा सर्वत्र लॉकडाउन लागू असतांना त्याचा  सर्वसामान्यांसह सर्वात मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला होता. व्यापारी प्रतिष्ठाने टाळेबंद असल्याने शहराचे अर्थचक्र सुद्धा डबघाईस निघाले होते. अश्या परिस्थितीत आपण सर्व लघु व मध्यम व्यापारी बांधव  किरकोळ विक्रते , हॉटेल व्यावसायिक यासह व्यापारी संघटना  या सर्वांशी समन्वय साधून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणून व्यापार पूर्व पदावर आणण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले होते. तसेच नंतरच्या काळात शहरातील मार्केट परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असल्याने त्याठिकाणी काँक्रीटीकरण, नालीचे बांधकाम, सौंदर्यीकरण, तसेच चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आगामी काळातही मार्केट परिसरात भौतिक सुविधा निर्माण करण्याचा नियोजित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासह व्यापारी हित जोपासत त्यांच्या सर्वांगीण हिताचे प्रश्न व व्यापारातील अडचणी सोडविण्याला आपले प्राधान्य असून व्यापारावरील विविध प्रकारच्या सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गांभीर्याने कर्तव्य बजावणार असल्याचा विश्वास महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभताई खोडके यांनी व्यक्त केला. आपल्या जनआशीर्वाद यात्रेतून आपल्या माणसांची भेट व त्यांना विश्वासात घेऊन अमरावती विधानसभा निवडणुकीत पुन्हा उतरलेल्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी  शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी शहराच्या मध्यभागी असलेल्या मार्केट परिसरात अभूतपूर्व पदयात्रा केली. यावेळी त्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले.  दरम्यान महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी रायली प्लॉट, महावीर मार्केट-दवा बाजार, पटेल मार्केट, गुलशन टॉवर, बेस्ट मार्केट, तखतमल इस्टेट, जयस्तंभ चौक, जवाहर रोड, सराफा बाजार, नमुना,गांधी चौक,चित्रा चौक,प्रभात चौक,राजकमल चौक, आदी भागात पदयात्रा करून येत्या बुधवार दिनांक  २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन क्रमांक ४ दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
पाच वर्षापूर्वी स्थानिक मार्केट परिसरात नाल्या चोक-अप होऊन पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने व्यापारी बांधवांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान आपल्या आमदारकीच्या सुरुवातीच्या काळात सुलभाताई खोडके यांनी स्थानिक भागात पाहणी करून त्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठीभरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे मार्केट भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामे करण्यात आल्याने परिसराचा चेहरा -मोहरा बदलला आहे.त्यामुळे या निवडणुकीतही सुलभाताईंच्या पाठीशी आम्ही उभं असल्याचा विश्वास व्यापारी बांधवानी व्यक्त करीत सुलभाताईंना विजयासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.  
शहरातील व्यापारी बांधवांच्या व्यापारात सुलभता यावी व त्यांना सुरक्षा प्रदान करण्याला घेऊन योग्य धोरण ठरविणार असून यासाठी व्यापारी बांधवांच्या सूचना व त्यांना अपेक्षेनुरून कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध करात सवलती, व्यवसायासाठी सबसिडीवर कर्ज योजना, किरकोळ व्यावसायिकांसाठी झोन तयार करून व्यवसायाला अभय देऊ, त्यांच्या मालाचे नुकसान होणारी नाही याची दक्षता बाळगून नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई अशा धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास आपले आगामी काळात कार्यतत्पर भूमिका बजावणार असल्याचा विश्वास सुद्धा महायुतीच्या उमेदवार आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केला. दरम्यान व्यापारी बांधव व असोशिएशन च्या वतीने सुलभाताईंचे स्वागत करीत सत्कार करण्यात आले. यावेळी महायुतीमधील घटक पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सहकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!