बंदीजनांना खया अर्थाने समुपदेशनाची गरज – कारागृह उपअधीक्षक प्रदीप इंगळे
अमरावती (दि. 18.11.2024)-
मानसोपचार करणे ही काळाची गरज असून भविष्याचा वेध लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे सुरू करण्यात आलेला एम. ए. सम्ुापदेशन व मानसोपचार हा अभ्यासक्रम समाजासाठी दगडाचा मैल ठरेल यात शंका नाही व यामुळे समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन कारागृह उपअधीक्षक श्री प्रदीप इंगळे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एम. ए. समुपदेशन व मानसोपचार या विषयामध्ये शिकणाया विद्याथ्र्यांसाठी तुरुंग भेट आयोजित करण्यात आली होती. बंदीजनांकरिता प्रात्यक्षिके व सामाजिक भावना जोपासण्याच्या दृष्टीने या भेटीचा उद्देश होता. यावेळी 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कारागृहाचे कामकाज कसे चालते, कारागृहाचे ब्राीदवाक्य, बंदीजनांचे समुपदेशन, बंदीजनां दिल्या जाणा-या सुविधांचे वेळापत्रक कसे ठरविले जाते, समुपदेशनाचा बंदीजनांना होणारा लाभ याविषयी कारागृह उपअधीक्षक श्री प्रदीप इंगळे, कारागृह शिक्षक श्री ललित मुळे, वरिष्ठ अधिकारी श्री शामराव गीते यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. बंदीजनांठी असलेल्या सुविधांमध्ये मेडिकल, ग्रंथालय, रेडिओ, शिक्षणासंबंधीची पुस्तके आदींबाबत विद्याथ्र्यांना प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. कारागृहातील बंदीजनांची वाढती संख्या लक्षात घेता समाजामध्ये कशी जनजागृती करता येईल व समुपदेशकांची भूमिका काय राहील याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भेटीचे नियोजन करण्यात आले. प्रा. अर्चना ढोरे, प्रा. सुरेश रहाटे यांनी यासाठी प्रयत्न केले. विद्याथ्र्यांच्या शंकांचे श्री इंगळे यांनी समाधान केले. त्यांचे याप्रसंगी रोपटे देऊन विभागाच्यावतीने स्वागत करण्यात आले.