दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ जलतरण (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित
अमरावती (दि. 18.11.2024) –
एस.आर.एम. इन्स्टिट¬ुट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, कट्टानकुलथूर, तामिळनाडू येथे 21 ते 23 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ जलतरण (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
चमूमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा युवराजसिंह ठाकुर व कु. वैभवी थेटे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा जयेश वानखडे, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीची कु. श्रावणी सपाटे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 09 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.