राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचे घवघवीत यश, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्याथ्र्यांचा सत्कार
अमरावती (दि. 18.11.2024) – अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 20 व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूंनी उत्कृष्टरितीने सादरीकरण करुन सात पारितोषिके मिळवून घवघवीत यश संपादन केले व विद्यापीठाचा नावलौकीक वाढविला. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व यश संपादन करणा-या विद्याथ्र्यांचा सत्कार केला. यश प्राप्त करावयाचे असेल, तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असून तेव्हाच यश पदरात पडते. कोणत्याही स्पर्धेत जय – पराजय हा महत्वाचा नसतो, तर सहभागी होऊन निखळ आनंद प्राप्त करणे महत्वाचे असते, असेही कुलगुरू याप्रसंगी म्हणाले.
सुगम संगीत स्पर्धेत अबसार साबरी याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर पाश्चिमात्य एकल स्पर्धेत कु. कोमल ढोके व्दितीय, स्वरवाद्य कला प्रकारामध्ये आकाश वानखडे व्दितीय, शास्त्रीय गायन स्पर्धेत शिवम शर्मा व्दितीय, वादविवाद स्पर्धेत नफिसा हुसैन व आरिफा हुसैन यांना व्दितीय, मिमिक्रीमध्ये तेजस दिवे याने तृतीय क्रमांक, तर पाश्चिमात्य समूहगान स्पर्धेतही त्याने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. सावन देशमुख, प्रा. नेत्रा मानकर यांनी भूमिका पार पाडली.