धर्मदाय संस्थेतील निराधार महिलांनी बजाविला मतदानाचा हक्क
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
ईशदया मदर टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेतील निराधार, परित्यक्ता, दिव्यांग, मानसिक रुग्ण अशा 55 महिलांनी आज मतदान केले. त्यांनी मतदान केंद्रावरील व्हीलचेअर तसेच आदी आवश्यक सुविधांचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाचा हक्क बजाविल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता साठे यांनी या सर्व महिलांना त्यांचे इपिक कार्ड, ओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्रे देऊन मतदान करण्यासाठी सहकार्य केले. ईशदया मदर टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेच्या सिस्टर रोसिन, जोसिका तसेच त्यांच्या मदतनीस यावेळी उपस्थित होत्या.