महाराष्ट्रात महायुतीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे

महाराष्ट्रात महायुतीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. दरम्यान, काहीजण या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक मानत आहेत. या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराने सर्वाधिक मतांनी विजय मिळवला आणि कोणी निसटता विजय मिळवला याचाच घेतलेला हा आढावा…
20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले. या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणातील युतीचे बदलते चित्र आणि मतदारांचे नवे प्राधान्यक्रम उलगडले. महाराष्ट्राच्या राजकारणाला ही निवडणूक ऐतिहासिक वळण देणारी ठरली.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे काशीराम पावरा यांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. त्यांनी शिरपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा 1,45,944 मतांनी पराभव करून निवडणुकीत सर्वात शानदार विजय संपादन केला.
तर, सर्वांत कमी मताधिक्य असलेला मतदारसंघ आहे मालेगाव मध्य. या मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला असून त्यांना १ लाख ९ हजार ३३२ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील आसिफ शेख राशिद यांना १ लाख ९ हजार २५७ मते मिळाली आहे. केवळ १६२ मतांच्या फरकाने आसिफ राशिद हरले आहेत.
तर दहिसर येथील मनसेचे उमेदवार राजेश येरूणकर… हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त २ मतं मिळाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा पहिला निकाल, राज्यातील वडाळा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शिवसेनेच्या (उबाठा) श्रद्धा श्रीधर जाधव यांचा 24973 मतांनी पराभव केला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघाचे निकाललात भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी विजयी झाले मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे. कारण याठिकाणी 2 लाख 18 हाजारांहून अधिक मते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही या निवडणुकीतील अतिशय आशर्य चकित करणार निकल आहे, हे विशेष.