अमरावती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका):अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात अमरावती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुलभा खोडके यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक सौरभ स्वामी, अमरावती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी सुलभा खोडके यांना प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार रुपेश खंडारे उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
जिल्हा :अमरावती संघ निहाय उमेदवारांची माहिती
निवडणूक लढवलेल्यात उमेदवारांना मिळालेली मते 38 – अमरावती
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- मेघा ज्ञानेश्वर तायडे – बहुजन समाज पार्टी – 1167
- पप्पु उर्फ मंगेश मधुकराव पाटील – महाराष्ट्र नवनिर्माण सेन – 2545
- डॉ. सुनिल पंजाबराव देशमुख – इंडियन नॅशनल काँग्रेस – 54674
- सूलभा संजय खोडके (विजयी) – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – 60087
- डॉ. अबरार – प्रहर जनशक्ती पार्टी – 416
- अलीम पटेल मो. वहीम – आझाद समाज पार्टी (कांशीराम) – 54591
- अविनाश धनवटे पिपल्स – पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) – 295
- ईफान खान उस्मान खान – इंडियन युनियन मुस्लिम लीग – 796
- दिगांबर वामन भगत – जन जनवादी पार्टी – 154
- मेराजुनिस्सा अब्दुल शकील रिपब्लिकन – पार्टी ऑफ इंडिया (ए) – 116
- राहूल लिलाधर मेश्राम – वंचित बहूजन आघाडी – 3048
- अनुष्का विजय बेलोरकर – अपक्ष – 507
- जगदीश गुप्ता – अपक्ष – 34067
- पुरषोत्तम कीसन बागडी – अपक्ष – 321
- मोहम्मद निसार मोहम्मद युसुफ – अपक्ष – 66
- रामकृष्ण अडकूजी महाजन – अपक्ष – 387
- रितेश रमेश तेलमोरे – अपक्ष – 144
- विकेश गोकूलराव गवाले – अपक्ष – 139
- विजय मा. ढाकुलकर – अपक्ष – 396
- शेख युसूफ शेख हुसेन – अपक्ष – 191
- शेख रहमत इनायत – अपक्ष – 108
- हेमंत नंदकिशोरराव वाटाने – अपक्ष – 187
नोटा – 856
एकूण – 215258
रिजेक्टण व्होवट – 198
टेंडर व्होसट – 33
अंतिम मतदार – 374458
पुरूष मतदार – 188426
स्त्री मतदार – 186005
इतर मतदार – 27