Uncategorized
बडनेरा मतदार संघातराष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात बडनेरा मतदार संघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना विजयी घोषित करून लोकशाही भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मतमोजणी निरीक्षक प्रांजल हजारिका, बडनेरा निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी रवी राणा यांना प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
जिल्हा :अमरावती संघ निहाय उमेदवारांची माहिती
निवडणूक लढवलेल्यात उमेदवारांना मिळालेली मते 37 – बडेनेरा
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- सुनिल बलदेवराव खराटे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – 7121
- रमेश पांडुरंग नागदिवे – बहुजन समाज पार्टी – 3502
- उत्तम किसनराव तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅाटिक) – 400
- रवि गंगाधर राणा (विजयी) – राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी – 127800
- राहुल लक्ष्मणराव मोहोड – भारतीय युवा जन एकता पार्टी – 574
- लिना घनश्याम ढोले – वंचित बहुजन आघाडी – 1672
- श्रीकांत बाबुरावजी फुलसावंदे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – 50
- सोनाली संजय मेश्राम – ओपन पीपल्स पार्टी – 103
- अजय भोजराज मंडपे – अपक्ष – 55
- नितीन बाबाराव कदम – अपक्ष – 650
- किरण कचरुआप्पा यमगवळी – अपक्ष -293
- कैलाश वसंतराव रोडगे – अपक्ष – 144
- गिरीश हरिदास बारबुध्दे – अपक्ष – 1293
- तुषार पंडितराव भारतीय – अपक्ष – 3337
- तुषार राजेंद्र पवार – अपक्ष – 137
- प्रशांत पंजाबराव जाधव – अपक्ष – 1309
- प्रिती संजय बंड – अपक्ष – 60826
- मुन्ना नारायणसिंग राठोड – अपक्ष – 241
- योगेश सुभाषराव कंटाळे – अपक्ष – 363
- राहूल नाना काजळे – अपक्ष -1134
- राहूल प्रकाश श्रृंगारे – अपक्ष – 408
- रंजाना धनराज डोंगरे/धनपाल – अपक्ष -68
- विजय मनोहर श्रीवास – अपक्ष – 48
- श्रीधर वासुदेव खडसे़ – अपक्ष – 119
- सचिन विनोदराव डहाके – अपक्ष – 49
- सुरेश पुंडलीकराव मेश्राम – अपक्ष – 113
नोटा – 692
एकूण – 212501
रिजेक्टे ड वोट – 0
टेंडर वोट – 5 अंतिम मतदार – 363825
पुरूष मतदार – 183009
स्त्री मतदार – 180771
इतर मतदार – 45